ETV Bharat / bharat

भारत जोडो न्याय यात्रेतून राहुल गांधी अचानक वायनाडला रवाना, काय आहे कारण? वाचा सविस्तर

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 17, 2024, 10:48 PM IST

राहुल गांधी
भारत जोडो न्याय यात्रेतून राहुल गांधी अचानक वायनाडला रवाना

राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा आज वाराणसीत पोहोचली. राहुल यांनी 5 तासात 12 किमी अंतर पार केलं. परंतु, राहुल गांधी वाराणसीतून अचानक वायनाडला रवाना झाले.

नवी दिल्ली : राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा आज शनिवार (दि. 17 फेब्रुवारी)रोजी वाराणसीत पोहचली. मात्र, अचानक राहुल गांधी वाराणसीहून विमानाने वायनाडला रवाना झाले. यानंतर चंदौलीचा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी सोशल मीडियावर ही माहिती दिली आहे. तसंच, 18 फेब्रुवारीला दुपारी 3 वाजल्यापासून राहुल गांधी या यात्रेत सहभागी होणार आहेत.

  • राहुल यांचा लोकसभा मतदारसंघ असलेल्या वायनाडमध्ये गेल्या एका आठवड्यात जंगली हत्तीच्या हल्ल्यात दोन जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये प्रशासनाविरोधात रोष आहे. लोक मोठ्या प्रमाणावर आंदोलन करत आहेत. राहुल या आंदोलनात सहभागी होणार आहेत.

द्वेष निर्माण केला तर देश कमकुवत होईल : भारत जोडो न्याय यात्रा पुन्हा एकदा प्रयागराज येथून 18 फेब्रुवारी रोजी दुपारी 3 वाजल्यापासून सुरू होणार आहे. राहुल गांधी यांची राजपुरा येथे जाहीर सभा होणार होती. ती रद्द करण्यात आली. राहुल गांधी अचानक वायनाडला गेल्यामुळे ही जाहीर सभा तूर्तास रद्द करण्यात आली. भारत जोडो न्याय यात्रेच्या दुसऱ्या टप्प्यात वाराणसीत पोहचली. यावेळी, हा देश द्वेषाचा नाही तर प्रेमाचा देश आहे. द्वेष निर्माण केला तर देश कमकुवत होईल, असं म्हणत राहुल गांधी यांनी भाजपा सरकारवर जोरदार टीका केलीय.

वाराणसीत 8 तास थांबले : उत्तर प्रदेशच्या दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी राहुल गांधी वाराणसीमध्ये जवळपास 8 तास थांबले. राहुल यांनी सकाळी 9 वाजता मुक्कामापासून प्रवासाला सुरुवात केली. कलेक्शन फार्म मांडूवाडीपर्यंत खुल्या जीपने गेले. त्यांनी कुरुना येथे प्रवास संपवला. अशा प्रकारे 5 तासात 12 किमीपर्यंत प्रवास केला. काशीमध्ये रोड शोसोबतच राहुल यांनी विश्वनाथ धाममध्ये दर्शन आणि पूजाही केली. गोदौलिया चौकातील जाहीर सभेत त्यांनी जीएसटी आणि महागाईबाबत केंद्रावर निशाणा साधला. त्यांच्यासोबत ज्येष्ठ नेते जयराम रमेश, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अजय राय यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. गौडौलिया चौकातून राहुल यांचा ताफा निघताच भाजप कार्यकर्त्यांनी गंगाजलानं रस्ता धुवून काढला.

हेही वाचा :

1 नकुल नाथ यांनी सोशल मीडियातून हटविलं काँग्रेसचं नाव, कमलनाथ यांनी ही' दिली प्रतिक्रिया

2 'ज्यांनी पक्ष स्थापन केला, त्यांचा पक्षच काढून दुसऱ्याला दिला, देशात कधी असं घडलं नाही'; शरद पवार

3 पुणे म्हाडाच्या अध्यक्षपदी शिवाजीराव आढळराव पाटील यांची नियुक्ती; तरीही लोकसभा निवडणूक लढण्यावर ठाम

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.