ETV Bharat / bharat

PM Narendra Modi : मोदींच्या हस्ते 10 वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा, तर 6000 रेल्वे प्रकल्पांची पायाभरणी, मुंबईतील किती स्थानकांचा समावेश?

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 12, 2024, 9:09 PM IST

PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 85,000 कोटींहून अधिक किमतीच्या 6000 रेल्वे प्रकल्पांची पायाभरणी आज (12 मार्च) करण्यात आली. तसंच देशभरातील 10 वंदे भारत ट्रेन आणि इतर रेल्वे सेवांना देखील पंतप्रधानांनी हिरवा झेंडा दाखवला.

Prime Minister Narendra Modi flagged off 10 Vande Bharat Trains and laid foundation of worth rupees 6000 railway projects
मोदींच्या हस्ते 10 वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा, तर 6000 रेल्वे प्रकल्पांची पायाभरणी, मुंबईतील किती स्थानकांचा समावेश?

मुंबई PM Narendra Modi : देशभरात आज (12 मार्च) अनेक ठिकाणी एकाच वेळी आयोजित केलेल्या कार्यक्रमांमध्ये 85,000 कोटींहून अधिक किमतीच्या 6000 रेल्वे प्रकल्पांची पायाभरणी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीनं करण्यात आली. यासह दहेज येथे पेट्रोनेट एलएनजीच्या पेट्रोकेमिकल्स कॉम्प्लेक्सची पायाभरणी त्यांनी केली. यावेळी लोकमान्य टिळक टर्मिनस येथे खासदार पूनम महाजन आणि खासदार मनोज कोटक उपस्थित होते. तसंच यावेळी मध्य रेल्वेचे विभागप्रमुख, अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते.

10 वंदे भारत ट्रेनला हिरवा कंदील : पंतप्रधान मोदींनी आज 10 वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला. यामध्ये कलबुरगि - बेंगळुरू, म्हैसूर - चेन्नई, लखनौ-देहराडून, रांची-वाराणसी, हजरत निजामुद्दीन-खजुराहो, न्यू जलपाईगुडी - पाटणा, पाटणा - लखनौ, सिकंदराबाद - विशाखापट्टणम, अहमदाबाद - मुंबई सेंट्रल आणि भुवनेश्वर - विशाखापट्टणम. तसेच अहमदाबाद - जामनगरला ओखापर्यंत, अजमेर-दिल्ली सराय रोहिल्ला चंदीगड पर्यंत, गोरखपूर - लखनौ प्रयागराज पर्यंत आणि तिरुअनंतपुरम - कासारगोड यांचा समावेश आहे.

'या' महत्त्वाच्या प्रकल्पांचा समावेश :

  • मनमाड, पिंपरी, लोकमान्य टिळक टर्मिनस, सोलापूर आणि नागभीड येथे 5 जन औषधी केंद्रांचं उद्घाटन करण्यात आलं.
  • बडनेरा येथे वॅगन दुरुस्ती कार्यशाळा आणि पुणे येथील वंदे भारत मेंटेनन्स कम वर्कशॉप डेपो, लातूर येथे कोच कारखान्याचं लोकार्पण
  • पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हिरवा झेंडा दाखविलेल्या 10 वंदे भारत ट्रेनमध्ये कलबुरगि - बेंगळुरू वंदे भारत ट्रेन आणि अहमदाबाद-मुंबई सेंट्रल वंदे भारत ट्रेनचाही समावेश आहे.
  • नाशिकरोड, अकोला, अंधेरी आणि बोरिवली येथे 4 रेल कोच रेस्टॉरंटचं उद्घाटन.

अनेक कामांचा शुभारंभ : 150 वन स्टेशन वन प्रॉडक्ट स्टॉलची पायाभरणी, 170 इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग सिस्टीम, 130 सोलर पॅनेल, 18 नवीन लाइन्सचे दुहेरीकरण, 2 गुड्स शेड, 7 ऑटोमॅटिक सिग्नलिंग सिस्टीम, 4 गती शक्ती टर्मिनल आणि 3 विद्युतीकरण प्रकल्प यांचा समावेश आहे. 50 प्रधानमंत्री भारतीय जन औषधी केंद्र, 222 रेल्वे गुड्स शेड, 51 गति शक्ती मल्टी-मॉडल कार्गो टर्मिनल, 2646 स्थानकांचे डिजिटल नियंत्रण, 35 रेल्वे कार्यशाळा, 1045 किमीच्या 80 रेल्वे लाईनवरील विभागांचे स्वयंचलित ब्लॉक सिग्नलिंग, 35 रेल्वे कोच रेस्टॉरंट्स, 1500 हून अधिक एक स्टेशन एक उत्पादन स्टॉल, 975 सौर उर्जेवर चालणारी स्टेशन/सेवा इमारती, 2135 किमी रेल्वे लाईन विभागांचं विद्युतीकरण आदी कामांचा देखील पंतप्रधान मोदींच्या हस्ते शुभारंभ झाला.

हेही वाचा -

  1. कोल्हापूर विमानतळाच्या नूतन टर्मिनलचं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लोकार्पण
  2. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज उत्तरप्रदेशला देणार 'मोठी भेट' : चार वंदे भारत, पाच जनऔषधी केंद्रासह 'या' प्रकल्पांचा आहे समावेश
  3. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आझमगड दौऱ्यावर: विद्यापीठ आणि विमानतळाचं करणार उद्घाटन
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.