ETV Bharat / bharat

लोकसभा निवडणूक 2024 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणशीतून दाखल केला नामांकन अर्ज - PM Narendra Modi Nomination

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 14, 2024, 10:27 AM IST

Updated : May 14, 2024, 12:46 PM IST

PM Narendra Modi Nomination : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज वाराणसी लोकसभा मतदार संघातून आपला नामांकन अर्ज दाखल केला आहे. यावेळी त्यांच्यासोबत अनेक दिग्गजांनी उपस्थिती लावली. पुष्य नक्षत्राच्या पावन पर्वावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपला नामांकन अर्ज सादर केला.

PM Narendra Modi Nomination
पंतप्रधान नरेंद्र मोदी (Etv Bharat Hindi)

लखनऊ PM Narendra Modi Nomination : देशात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सध्या जोरात सुरू आहे. पाचव्या टप्प्याच्या लोकसभा निवडणुकीची तयारी आता सुरू झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज वाराणसी लोकसभा मतदार संघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी पुष्य नक्षत्रावर 11 वाजता काशी विश्वेश्वरांचं दर्शन घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयात नामांकन अर्ज दाखल केला आहे. विशेष म्हणजे आज गंगा सप्तमीचं पर्व आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गंगेला दशाश्वमेध घाटावर जाऊन गंगेला नमन केलं. त्यानंतर ते कालभैरव मंदिरात दर्शनासाठी गेले.

पंतप्रधानांनी गंगा पूजन करुन केली कालभैरव अष्टकाची पूजा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ताफा वाराणसीतील बनारस लोकोमोटिव्ह वर्कशॉप गेस्ट हाऊस इथून सकाळी साडेआठ वाजता निघाला. त्यानंतर त्यांचा ताफा गंगा पूजा करण्यासाठी दशाश्ववमेध घाटावर पोहोचला. इथं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विधीनुसार गंगा मातेची पूजा केली. गंगा पूजन केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी कालभैरव मंदिराकडं रवाना झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कालभैरव मंदिरात भैरव अष्टकाची पूजा केली. बाबा कालभैरवची आरती झाल्यानंतर त्यांनी नामांकन अर्ज भरण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय गाठलं. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्यासोबत त्यांचे समर्थकांची उपस्थिती होती.

बारा राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची उपस्थिती : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज वाराणसी लोकसभा मतदार संघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. वाराणसी लोकसभा मतदार संघातून अर्ज दाखल करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सकाळी 11 वाजता पोहोचले. यावेळी नामांकन दाखल करताना तब्बल 12 राज्याचे मुख्यमंत्री उपस्थित होते. यात बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, उत्तराखंड राज्याचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी, मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव, छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णू देव साई, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राजस्थान, आसाम, हरियाणा, गोवा, सिक्कीम, त्रिपुरा या राज्यांचे मुख्यमंत्रीही यावेळी उपस्थित होते.

वाराणसीत तगडा पोलीस बंदोबस्त : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज वाराणसी लोकसभा मतदार संघातून त्यांचा नामांकन अर्ज दाखल केल्यानं वाराणसीत तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काशीमध्ये पुष्य नक्षत्राच्या पावन पर्वावर सकाळी 11 वाजता नामांकन अर्ज दाखल केला.

हेवी वाचा :

  1. कोरोना लसीबाबत पंतप्रधान मोदींविरोधात वाराणसी न्यायालयात याचिका दाखल; 'हा' आहे आरोप - PM Modi Corona Vaccine
  2. "मोदींनी दहा वर्षे फक्त थापा मारल्या, पुन्हा निवडून आल्यास..."उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल - uddhav thackeray interview
  3. पंतप्रधान नरेंद्र मोदींची शरद पवारांना ऑफर; राजकीय वर्तुळातून संमिश्र प्रतिक्रिया - lok sabha election
Last Updated :May 14, 2024, 12:46 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.