ETV Bharat / bharat

छत्तीसगडमधील 776 कोटी रुपयांच्या दारु घोटाळ्यातील मुख्य आरोपीला बिहारमधून अटक - Chhattisgarh Liquor Scam

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 12, 2024, 12:07 PM IST

Chhattisgarh Liquor Scam : छत्तीसगडमधील कथित दारु घोटाळ्याच्या तपासाची पाळमुळं बिहारपर्यंत पोहोचली आहे. छत्तीसगडच्या एसीबी आणि आर्थिक गुन्हे शाखेनं छापा टाकून मुख्य आरोपीला गोपालगंज इथून अटक केली आहे. अटकेनंतर एसीबीचे पथक आरोपींना घेऊन छत्तीसगडला परतले. आता या प्रकरणात मोठे खुलासे होऊ शकतात.

छत्तीसगडमधील 776 कोटी रुपयांच्या दारु घोटाळ्यातील मुख्य आरोपीला बिहारमधून अटक
छत्तीसगडमधील 776 कोटी रुपयांच्या दारु घोटाळ्यातील मुख्य आरोपीला बिहारमधून अटक

गोपालगंज Chhattisgarh Liquor Scam : छत्तीसगडच्या एसीबीनं 776 कोटी रुपयांच्या कथित दारु घोटाळ्यातील आरोपी अरुणपती त्रिपाठी याला भोर पोलिस स्टेशनच्या मदतीनं सिसाई गावातून अटक केलीय. अटकेनंतर छत्तीसगड पोलीस आरोपीसह छत्तीसगडला रवाना झाले आहेत.

छत्तीसगड दारू घोटाळ्याप्रकरणी मोठी अटक : या संदर्भात पोलीस अधीक्षक स्वर्ण प्रभात म्हणाले की, 11 एप्रिल 2024 रोजी एसीबीची टीम गोपालगंज पोलिसांच्या मदतीनं सिसाई गावात पोहोचली आणि छापा टाकला. यावेळी नातेवाईकाच्या घरी थांबलेल्या आरोपी अरुणपती त्रिपाठी याला अटक करण्यात आली. याच्यावर 776 कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप आहे.

छत्तीसगड एसीबी आणि आर्थिक गुन्हे शाखा करत आहे तपास : आरोपीविरुद्ध आधीच ईडीमध्ये खटला दाखल आहे. अटकेनंतर माजी विशेष सचिव अरुणपती त्रिपाठी यांचा एक व्हिडिओही समोर आला. ते छत्तीसगड सरकारमध्ये कार्यरत होते. त्यावेळी त्यांच्यावर दारु घोटाळ्यात कमिशनच्या गैरव्यवहाराचा आरोप होता. याप्रकरणी ईडीनंही गुन्हा दाखल केला आहे. छत्तीसगडमध्ये 776 कोटी रुपयांच्या दारू घोटाळ्याचं प्रकरण होतं. यात सरकारनं एसीबी आणि आर्थिक गुन्हे शाखेद्वारे नवीन तपासासाठी एफआयआर दाखल केला होता.

छत्तीसगड दारू घोटाळ्यात 70 आरोपी : या घोटाळ्यातील एफआयआरमध्ये छत्तीसगडच्या उत्पादन शुल्क विभागाचे माजी विशेष सचिव आणि छत्तीसगड स्टेट मार्केटिंग कॉर्पोरेशन लिमिटेडचे (CSMCL) एमडी अरुणपती त्रिपाठी यांच्यासह 70 जणांना आरोपी करण्यात आलं होतं. याप्रकरणी अरुणपती त्रिपाठी हा फरार होता. परंतु गुप्त माहिती व तंत्रज्ञानाच्या आधारे 11 एप्रिल रोजी रात्री छत्तीसगडमधील पाच सदस्यीय पथकानं गोपालगंज पोलिसांच्या मदतीनं भोर पोलीस स्टेशन हद्दीतील सिसाई गावातून त्याला अटक केली.

काय आहे कथित छत्तीसगड दारु घोटाळा? : ईडीनं 2019 ते 22 दरम्यान छत्तीसगडमधील डिस्टिलर्सकडून 776 कोटी रुपयांची लाच घेतल्याचा आरोप केलाय. सरकार बदलताच या प्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला. तत्कालीन काँग्रेस आघाडी सरकारमधील मंत्री कावासी लखमा, उत्पादन शुल्क विभागाचे माजी विशेष सचिव आणि छत्तीसगड स्टेट मार्केटिंग कॉर्पोरेशन लिमिटेडचे ​​एमडी अरुणपती त्रिपाठी यांच्यासह एकूण 70 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

हेही वाचा :

  1. तुरुंगातून बाहेर पडताच संजय 'सिंह' यांची गर्जना, 'आप'चा संघर्ष करण्याचा निर्धार - MP Sanjay Singh granted bail
  2. अरविंद केजरीवालांपाठोपाठ के कवितांचाही पाय खोलात; दोघेही ईडी कोठडीत - Delhi Liquor Policy Scam Case
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.