ETV Bharat / bharat

तुरुंगातून बाहेर पडताच संजय 'सिंह' यांची गर्जना, 'आप'चा संघर्ष करण्याचा निर्धार - MP Sanjay Singh granted bail

author img

By ANI

Published : Apr 4, 2024, 9:49 AM IST

Sanjay Singh Bail
Sanjay Singh Bail

Sanjay Singh Bail : कथित दिल्ली दारू धोरण घोटाळ्याप्रकरणात सर्वोच्च न्यायालयानं संजय सिंह यांना जामीन मंजूर केला. ऑक्टोबर 2023 मध्ये संजय सिंह यांना ईडीनं अटक केली होती. याच प्रकरणात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनादेखील काही दिवसापूर्वी अटक करण्यात आली आहे.

दिल्ली Sanjay Singh Bail : आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह यांची बुधवारी तुरुंगातून सुटका झालीय. त्यानंतर त्यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना पाठिंबा दर्शवला आहे. आप आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना संजय सिंह म्हणाले, "मी सहा महिन्यांपासून तुरुंगात आहे. प्रत्येक कार्यकर्ता, आप पक्षाचे नेते केजरीवाल यांच्या पाठीशी उभे आहे. 'आप'चा जन्म आंदोलनातून झाला आहे. त्यामुळं आम्हाला कशाचीही भीती वाटत नाही. भाजपाला 'आप' पक्षाला नेस्तनाबूत करायचंय".

केजरीवाल राजीनामा देणार नाही : "अरविंद केजरीवाल अजिबात राजीनामा देणार नाहीत. दिल्लीच्या दोन कोटी जनतेसाठी केजरीवाल काम करतील. सहा महिने तुरुंगात राहिल्यानंतर मी परत आलो आहे. तुरुंगात असताना कोणतीही व्यक्ती अमर्यादित पत्र लिहू शकतो, असं जेल मॅन्युअलमध्ये लिहिलं आहे. जर एखाद्याला सरकारी पत्र लिहायचं असेल, तर न्यायालयाची परवानगी आवश्यक आहे, "असं सिंह म्हणाले.

आम आदमी पक्ष संघर्ष करणार : यावर बोलताना 'आप'चे नेते सौरभ भारद्वाज म्हणाले, "अरविंद केजरीवाल तुरुंगातून बाहेर येईपर्यंत पक्ष जल्लोष करणार नाही. संजय सिंह नुकतेच तुरुंगातून बाहेर आले. त्यांचं हजारो कार्यकर्त्यांनी स्वागत केलंय. हा वेळ जल्लोष साजरा करण्याचा नसून संघर्ष करण्याचा आहे. आमचे तीन प्रमुख नेते अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदिया, सत्येंद्र जैन अजूनही तुरुंगात आहेत. त्यांची सुटका होईपर्यंत आम्ही आनंदोत्सव साजरा करणार नाही, आम्ही संघर्ष करत राहू," असं ते म्हणाले.

  • संजय सिंह यांच्यावर फुलांचा वर्षाव : संजय सिंह यांचे वडील दिनेश सिंह म्हणाले, 'त्यांचं कुटुंबीय, पक्षाचे कार्यकर्ते सिंग यांच्या सुटकेला खास क्षण म्हणून पाहत आहेत. माझ्या पूर्वीच्या अनुभवांवर आधारित हा अनपेक्षित निर्णय आहे. माझा फक्त देव तसंच दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांवर विश्वास होता'. यावेळी आप कार्यकर्त्यांनी संजय सिंह यांच्यावर फुलांचा वर्षाव केला.

सत्याचा विजय : "सत्याचा विजय झाला आहे. गेल्या दोन वर्षांपासून या कथित दिल्ली दारू धोरण प्रकरणाचा तपास सुरू होता. ईडीनं अनेक ठिकाणी छापे टाकले, पण तरीही त्यांना AAP नेत्यांकडं भ्रष्टाचाराचा पैसा सापडला नाही. आता आपचे कार्यकर्ते या हुकूमशाहीविरोधात लढणार आहेत. संजय सिंह हे आम आदमी पक्षाचे वाघ आहेत. ते आता नरेंद्र मोदींच्या निरंकुशतेविरुद्ध गर्जना करतील', असं दिल्लीच्या मंत्री अतिशी यांनी म्हटलंय.

भाजपाची टीका : " 'आप' खासदार जामिनावर बाहेर आहेत. ते आजूनही आरोपमुक्त झाले नाहीत," असं दिल्ली भाजपा अध्यक्ष वीरेंद्र सचदेवा यांनी म्हटलं आहे. "भ्रष्ट पक्षाचे नेते जामिनावर बाहेर पडल्यावर पक्षाचा जयजयकार होतो. यावरून पक्षाची मानसिकता दिसून येते. जामीन तुम्हाला मुक्त करत नाही, एकदा जामीन मिळाल्यावर तोही संपतो. आम आदमी पार्टीचं चारित्र्य खोटं आणि फसवेगिरी करणारं आहे." भाजप खासदार मनोज तिवारी यांनी सांगितलं की, "ते न्यायालयाच्या प्रत्येक निर्णयाचं स्वागत करतात. ज्या प्रकारचा उत्सव आप करत आहे. या खटल्यातून त्यांची निर्दोष मुक्तता झाल्याचं ते सांगत आहेत. न्यायालयानं त्यांना सशर्त जामीन मंजूर केलाय. खटला अजूनही सुरू आहे. जामीन देणं हे न्यायालयाचं काम आहे."

केजरीवालांना 15 एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी : दिल्लीतील राऊस एव्हेन्यू न्यायालयानं संजय सिंह यांना काही अटीसह जामीन मंजूर केला आहे. दिल्ली अबकारी धोरण, मनी लाँड्रिंग प्रकरणात संजय सिंहला ईडीनं गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये अटक केली होती. नुकतेच मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनाही अटक करण्यात आली आहे. त्यांना 15 एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आलं आहे. या प्रकरणात मनीष सिसोदियादेखील न्यायालयीन कोठडीत आहेत.

हे वाचलंत का :

  1. जेल के ताले टूटेंगे, केजरीवाल-सिसोदिया सत्येंद्र जैन छूटेंगे! तुरुंगाबाहेर येताच 'आप' नेते संजय सिंह गरजले - Sanjay Singh Out Of Jail
  2. अरविंद केजरीवालांचं तब्बल 5 किलोनं घटलं वजन; आम आदमी पक्षाचा सरकारवर गंभीर आरोप - Arvind Kejriwal Lost 5 Kg Weight
  3. अरविंद केजरीवालांच्या अटकेविरोधात रामलीला मैदानावर 'इंडिया आघाडी'ची निदर्शनं; उद्धव ठाकरे, शरद पवार राहणार उपस्थित - INDIA Alliance Protest
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.