ETV Bharat / bharat

पंतप्रधान मोदींना भेटण्यासाठी परदेशी पिता-पुत्रांची अनोखी शक्कल, वाचा कसं गाठलं काझीरंगा पार्क?

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 8, 2024, 10:20 PM IST

PM Modi visit to Assam : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज शुक्रवार (दि. 8 मार्च)रोजी आसाममधील काझीरंगा राष्ट्रीय उद्यानाला भेट देणार आहेत. दरम्यान, नरेंद्र मोदी यांना भेटण्यासाठी अमेरिकेतील एका पिता-पुत्राने शिलाँग ते काझीरंगा असा प्रवास केला आहे. त्यांनी शिलाँगमध्ये एक ऑटो विकत घेतला आणि तेथून काझीरंगा नॅशनल पार्क असा प्रवास केला आहे.

पंतप्रधान मोदींना भेटण्यासाठी परदेशी पिता-पुत्र रिक्षातून आले
पंतप्रधान मोदींना भेटण्यासाठी परदेशी पिता-पुत्र रिक्षातून आले

पंतप्रधान मोदींना भेटण्यासाठी परदेशी पिता-पुत्र रिक्षातून आले

गुवाहाटी/ आसाम : PM Modi visit to Assam : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज शुक्रवार (दि. 8 मार्च)रोजी दोन दिवसांच्या आसाम दौऱ्यावर पोहोचले आहेत. यावेळी, काझीरंग राष्ट्रीय उद्यान येथे ते निवास्थानी असणार आहेत. मोदी या दोन दिवसांत 18,000 कोटी रुपयांच्या प्रकल्पांचं उद्घाटन करणार आहेत. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी आसाममधील काझीरंगा राष्ट्रीय उद्यानात मुक्कामी असणार आहेत, ही बातमी मिळताच काझीरंगा पार्कमध्ये मोदींना भेटण्यासाठी पर्यटकांची गर्दी होऊ लागली आहे. मात्र, दोन परदेशी पिता-पुत्रांनी मोदींना विलक्षण मार्ग निवडला आहे. ते शिलाँगहून ऑटो चालवत काझीरंगाला दाखल झाले आहेत.

शिलाँग ते काझीरंगा : लेन मुइलमन आणि नाटे मुइलमन अशी या अमेरिकन पिता-पुत्रांची नाव आहेत. दरम्यान, या दोघांनी सांगितलं की, ते ईशान्य भारताच्या सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी अमेरिकेतून आले आहेत. (दि. 28 फेब्रुवारी)रोजी ते अमेरिकेतून शिलाँगला पोहोचले. शिलाँगहून ते काल गुरुवारी काझीरंगा येथे पोहोचले. नैसर्गिक सौंदर्याने भारावून जाण्याबरोबरच, पिता-पुत्र जोडीने ईशान्येकडील आणि तेथील लोकांच्या आदरातिथ्याचंही कौतुक केलं आहे.

गेंडा संवर्धनाचा संदेश : पंतप्रधान नरेंद्र मोदी काझीरंगा राष्ट्रीय उद्यानात येत असल्याची बातमी मिळताच आपण खास काझीरंगा येथे पोहोचल्याचंही यांनी सांगितलं आहे. पंतप्रधान मोदींना भेटणं हेच आमचं उद्दिष्ट आहे असंही त्यांनी सांगितलं आहे. विशेष म्हणजे शिलाँगहून ऑटोरिक्षा खरेदी करून आणि ती स्वतः चालवून पिता-पुत्र दोघंही काझीरंगा येथे पोहोचले आहेत. त्याचबरोबर काझीरंगातील गेंडा संवर्धनाचा संदेशही त्यांच्या ऑटोवर लिहिला आहे.

तीन हेलिपॅड तयार करण्यात आले : काझीरंगातील गेंड्याच्या संरक्षणाचा मुद्दा ऑटोरिक्षात चित्रांसह मांडत पिता-पुत्र काझीरंगाच्या विविध भागात फिरत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बहुप्रतिक्षित काझीरंगा येथे शुक्रवारी होणाऱ्या आगमनासाठी सरकार, प्रशासन आणि वन विभागाने सर्व तयारी पूर्ण केली आहे. दरम्यान, पंतप्रधानांच्या हेलिकॉप्टरच्या लँडिंगसाठी पानबारीत तीन हेलिपॅड तयार करण्यात आले होते.

हेही वाचा :

1 सुधा मूर्ती यांना राज्यसभेचे खासदार म्हणून नामांकन, पंतप्रधान मोदी यांनी केलं अभिनंदन

2 आमदार रोहित पवारांना ईडीचा झटका; कन्नड सहकारी साखर कारखाना जप्त, पवार म्हणाले, "भाजपात जायचं का?"

3 केदारनाथ धाम भाविकांसाठी आनंदाची बातमी! दरवाजे 'या' तारखेला उघडले जाणार

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.