ETV Bharat / bharat

शेतकरी आंदोलनाची आज ठरणार रणनीती, शंभू-खनौरी सीमेवर ट्रॅक्टरच्या संख्येत वाढ

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 3, 2024, 12:47 PM IST

Farmers Protest
Farmers Protest

Farmers Protest : शेतकरी संघटनांकडून दिल्लीवर मोर्चा काढण्याबाबत पुढील रणनीती आज जाहीर करणार आहेत. शंभू आणि खनौरी सीमेवर ट्रॅक्टर ट्रॉलींची संख्या वाढू लागली आहे. दुसरीकडं डबवली हद्दीतही शेतकऱ्यांनी आंदोलनाची तयारी सुरू केली आहे.

चंदीगड Farmers Protest : किमान हमीभाव ( MSP) हमी कायदा तसंच स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात, यासह अनेक मागण्यांसाठी हरियाणाच्या सीमेवर शेतकरी आंदोलन करत आहेत. आज शेतकरी आंदोलनाचा 20 वा दिवस आहे. शेतकरी शुभकरन सिंह यांचा मृत्यू झाल्यानं शोकसभा घेण्यात येणार आहे. त्यानंतर दिल्ली मार्चबाबत पुढील रणनीती जाहीर होण्याची शक्यता आहे. शेतकरी आंदोलनाला पंजाबमधील विविध कलाकारांनी पाठिंबा दिला.

आज ठरणार रणनीती : भटिंडा येथील बल्लो गावात आज शोकसभा घेतली जाणार आहे. त्यामुळं अधिकाधिक शेतकऱ्यांनी बल्लोळ गावात पोहोचण्याचं आवाहन यावेळी शेतकरी नेते सर्वनसिंह पंढेर यांनी केलं आहे. 21 फेब्रुवारीला खानूरी सीमेवर शुभकरन सिंह यांच्या मृत्यूनंतर शेतकऱ्यांनी दिल्लीकडं मोर्चा काढण्याचा निर्णय 29 फेब्रुवारीपर्यंत पुढं ढकलला होता. त्यानंतर दिल्ली मोर्चाची पुढील रणनीती 3 मार्चला जाहीर करण्यात येणार असल्याचं शेतकरी नेत्यांनी सांगितलं होतं.

संयुक्त किसान मोर्चानं दिला 8-सूत्री प्रस्ताव : 22 फेब्रुवारी 2022 रोजी चंदीगड येथे झालेल्या सर्वसाधारण सभेत SKMच्या सहा सदस्यीय समितीनं स्वीकारलेला 8-सूत्री प्रस्ताव हा संयुक्त किसान मोर्चा तसंच किसान मजदूर यांच्या प्रतिनिधींना दिला होता.

पावसातही शेतकरी आंंदोलनावर ठाम : पंजाब, हरियाणाच्या सीमेवर शेतकरी MSPसह इतर मागण्यांसाठी ठाम आहेत. बदलत्या हवामानापासून वाचण्यासाठी शेतकऱ्यांनी दैनंदिन गरजेच्या सर्व वस्तू ट्रॉलीमध्ये ठेवल्या आहेत. ट्रॉलीमध्ये झोपण्यासाठी बेड, चार्जिंग स्लॉट आणि किचन सेटअप लावण्यात आले आहेत. याशिवाय परिसरातील लोक शेतकऱ्यांच्या जेवणासाठी लंगरची व्यवस्था करत आहेत.

13 फेब्रुवारीपासून शेतकरी पंजाब-हरियाणा सीमेवर : 13 फेब्रुवारीला दिल्लीच्या दिशेनं कूच करणाऱ्या हजारो शेतकऱ्यांना हरियाणा सीमेवर थांबवण्यात आलं होतं. त्यावेळी शेतकरी आणि सुरक्षा जवानांमध्ये चकमक झाली होती. यामध्ये अनेक शेतकरी गंभीर जखमी झाले आहे. तर काही आंदोलकांचा मृत्यू झाल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे. तेव्हापासून हरियाणा-पंजाबच्या शंभू, खानूरी सीमेवर शेतकरी तळ ठोकून आहेत. शेतकऱ्यांना रोखण्यासाठी हरियाणा पोलिसांनी सीमेवर अनेक बॅरिकेड्स लावले आहेत. त्यात सिमेंटच्या भिंतींचाही समावेश आहे.

हे वाचलंत का :

  1. शेतकरी आंदोलन आणखी एका शेतकऱ्याचा मृत्यू, पंजाबच्या सीमेवर तणावाची स्थिती
  2. शेतकरी आंदोलकांच्या हल्ल्यात 12 जवान जखमी, एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याचा दावा
  3. सरकारबरोबर चर्चेची चौथी फेरीही निष्फळ; शेतकरी 21 फेब्रुवारीला दिल्लीकडे कूच करणार
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.