ETV Bharat / bharat

शेतकरी आंदोलन : सरकारसोबत चौथ्यांदा होणार चर्चा; हरियाणातील इंटरनेट सेवा बंदच

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 18, 2024, 9:22 AM IST

शेतकरी आंदेलन
शेतकरी आंदेलन

Farmers Protest 2024 Update : विविध मागण्यांसाठी शेतकरी आंदोलक दिल्लीकडं कूच करत आहेत. 13 फेब्रुवारीपासून शेतकरी दिल्लीजवळील शंभू सीमेवर आंदोलन करत आहेत. आतापर्यंत शेतकरी आणि सरकारमध्ये चर्चेच्या तीन फेऱ्या झाल्या, मात्र, अद्यापपर्यंत शेतकरी आणि सरकारमध्ये पूर्णत: 'समझोता' झालेला नाही. आज पुन्हा एकदा बैठकीची चौथी फेरी होणार आहे.

नवी दिल्ली Farmers Protest 2024 Update : आपल्या मागण्या घेऊन पंजाब, हरियाणामधील शेतकरी दिल्लीकडं येत आहेत. त्यामुळं दिल्लीजवळील सर्व सीमांवर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. हे सर्व शेतकरी सध्या शंभू सीमेवर आंदोलन करत आहेत. त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळं हरियाणातील सात जिल्ह्यांमध्ये पुन्हा एकदा इंटरनेट सेवेवरील बंदी वाढवण्यात आलीय.

सरकार आणि शेतकऱ्यांमध्ये पुन्हा होणार चर्चा : 'मएसपी'ह विविध मागण्यांबाबत शंभू सीमेवर शेतकरी ठाण मांडून आहेत. दिल्लीकडं कूच करण्यासाठी सीमेवर शेतकरी मोठ्या संख्येनं जमले आहेत. त्याचबरोबर शेतकऱ्यांनीही अनेकवेळा प्रशासनावर दगडफेक केल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. अशा स्थितीत आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी अनेकवेळा अश्रुधुराच्या नळकांड्याही फोडल्या. पोलीस आणि शेतकरी यांच्यात झालेल्या झटापटीत अनेक पोलीस कर्मचारी आणि शेतकरी जखमी झाले आहेत. शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळं हरियाणा सरकारनं राज्यातील सात जिल्ह्यांतील इंटरनेट सेवेवरील निर्बंध पुन्हा एकदा वाढवले ​​आहेत. तर तीन फेऱ्यांच्या चर्चेनंतर आज पुन्हा एकदा शेतकरी आणि सरकार यांच्यात चौथ्यांदा चर्चा होणार आहे.

हरियाणातील इंटरनेट सेवेवरील निर्बंध वाढवले : शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळं हरियाणातील सात जिल्ह्यांतील इंटरनेट सेवेवरील बंदी आणखी 2 दिवसांसाठी वाढवण्यात आलीय. या आदेशानुसार, 19 फेब्रुवारीच्या मध्यरात्री 12 पर्यंत इंटरनेट सेवेवर बंदी असेल. हरियाणातील अंबाला, कुरुक्षेत्र, कैथल, जिंद, हिसार, फतेहाबाद आणि सिरसा या जिल्ह्यांत इंटरनेट सेवा बंद राहणार आहे.

शेतकऱ्यांशी आज चौथ्यांदा चर्चा : शेतकऱ्यांशी यापुर्वी तीनदा चर्चा झाल्या आहेत. पहिली चर्चा 8 फेब्रुवारी, दुसरी 12 फेब्रुवारी आणि 15 फेब्रुवारी रोजी शेतकऱ्यांसोबत तिसऱ्यांदा चर्चा झाली. पण, शेतकरी आणि सरकारमध्ये झालेल्या या चर्चांमधून पूर्ण समाधान निघालं नाही. तिसऱ्या चर्चेनंतरही काही मुद्दे रखडल्याचं सांगण्यात येतंय. आता आज पुन्हा एकदा चंदीगडमध्ये संध्याकाळी 6 वाजता शेतकरी आणि सरकारमध्ये चौथ्यांदा चर्चा होणार आहे. पहिल्या आणि तिसऱ्या बैठकीला केंद्रीय मंत्र्यांशिवाय पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मानही उपस्थित होते.

सहा दिवसांपासून शेतकरी शंभू सीमेवर : आपल्या मागण्या घेऊन दिल्लीकडं निघालेल्या शेतकऱ्यांचा शंभू सीमेवर आज सहावा दिवस आहे. दरम्यान, पंजाब किसान मजदूर संघर्ष समितीचे सरचिटणीस सर्वनसिंग पंढेर म्हणाले की, "शंभू सीमेवर आज आमचा सहावा दिवस आहे. आजही आम्ही सरकारशी बोलत आहोत. सरकारनं थोडा वेळ मागितला असून या विषयावर चर्चा करणार असल्याचं सांगितले. यावर केंद्रीय मंत्र्यांशी बोलून तोडगा काढू."

'एमएसपी'सह कोणत्या मुद्द्यांवर अडचण : शेतकरी नेत्यांनी आतापर्यंत सरकारशी तीनवेळा चर्चा केल्या आहेत. तिन्ही चर्चांमध्ये शेतकरी आणि सरकार यांच्यात पूर्ण सहमती होऊ शकली नाही. काही मुद्द्यांवर समितीच्या अभ्यासानंतर निर्णय घेतला जाईल, असं सरकारनं म्हटलंय. तर हे प्रकरण अजूनही एमएसपी आणि शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर अडकलंय. अशा परिस्थितीत शंभू सीमेवर शेतकऱ्यांनी दिल्लीकडे कूच करण्याचा निर्धार केलाय. परंतु, सीमेवर कडक सुरक्षा दल आणि अनेक थरांच्या बॅरिकेड्समुळं शेतकरी पुढे जाऊ शकत नाहीत. आता आज चौथ्यांदा होणाऱ्या चर्चेत काही तोडगा निघतो का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

हेही वाचा :

  1. आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्याचा हृदयविकारानं मृत्यू, शंभू सीमेवरील दुर्दैवी घटना
  2. पंतप्रधान नरेंद्र मोदींना घरचा आहेर, शेतकरी आंदोलनावरुन सुब्रमण्यम स्वामी म्हणाले, मोदींना कशाला प्राधान्य द्यावं ते कळत नाही
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.