ETV Bharat / bharat

चिनी आक्रमणाचे दुष्परिणाम नेहरुंच्या काळातीलच, विरोधकांचे आरोप खोटे; परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांचा दावा - S Jaishankar

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 13, 2024, 5:25 PM IST

EAM S Jaishankar : चीनकडून आक्रमण होत आहे. गावं वसवली जात आहेत, पूल बांधले जात आहेत, असा आरोप विरोधकांकडून केला जातोय. मात्र, हे सर्व आरोप खोटे असून ही गावं 1958 मध्ये वसवली गेली आणि पूल चीन आक्रमणापूर्वी म्हणजे 1962 पूर्वी बांधला गेल्याचा दावा परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी केला.

परराष्ट्रमंत्री एस जयशंकर
परराष्ट्रमंत्री एस जयशंकर (Desk)

परराष्ट्रमंत्री एस जयशंकर (ETV Bharat Reporter)

मुंबई EAM S Jaishankar : चीनकडून भारतावर आक्रमण होत असून भारताचा भूभाग चीननं पदाक्रांत केलाय. तसंच त्यावर काही गावं आणि पूल बांधले आहेत, असे दावे विरोधकांकडून होत आहेत. मात्र, ही गावं आणि पूल ही 62 पूर्वी बांधले आहेत आणि नेहरुंच्या काळातच या गोष्टी घडल्या आहेत, असा दावा परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी केलाय. ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.



नेहरुंच्या काळात गावं वसवली : भारताचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी आज मुंबईत बोलताना चीनकडून होणाऱ्या आक्रमणाबद्दल चिंता व्यक्त केली. मात्र, "चीनकडून होणारं आक्रमण भारतीय जवान अतिशय सक्षमरित्या परतवून लावत आहेत. प्राणाची बाजी लावून आपले जवान सीमांचं रक्षण करत आहेत. त्यामुळं आपल्या सर्व सीमा सुरक्षित आहेत, असं जयशंकर यांनी सांगितलं. भारताच्या सीमेवर चीनकडून आक्रमण होत आहे. गावं वसवली जात आहेत, पूल बांधले जात आहेत, असा आरोप विरोधकांकडून केला जातोय. मात्र, हे सर्व आरोप खोटे आहेत. ही गावं 1958 मध्ये वसवली गेली आणि पूल चीन आक्रमणापूर्वी म्हणजे 1962 पूर्वी बांधला गेला," असा दावा परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी केलाय.

सैनिकांचं खच्चीकरण करु नका : दरम्यान "आपले सैनिक पाकिस्तान सीमेवर आणि चीनच्या सीमेवर दोन्ही ठिकाणी अतिशय ताकदीनं सामना करत आहेत. मात्र, अशा वेळेस विरोधकांकडून आपल्या सैनिकांचं खच्चीकरण केलं जातंय. भारतीय सैनिकांना मारुन पळवण्यात आलं अशा पद्धतीची वक्तव्य राहुल गांधी करत आहेत. त्यामुळं आपल्या सैनिकांचं मनोबल खचत असून अशा पद्धतीनं सैनिकांचं मनोबल खचनं योग्य नाही. त्यांना पाठिंबा द्यायला पाहिजे," असं जयशंकर यांनी यावेळी सांगितलं.

पाकव्याप्त काश्मीर मिळवणारच : एस जयशंकर पुढं म्हणाले की, "पाकव्याप्त काश्मीर हा भारताचाच भाग आहे. पाकिस्तानकडं अणुशक्ती आहे, त्यामुळं आपण त्यांच्याशी सांभाळून बोललं पाहिजे असं विरोधक म्हणत आहेत. पण आपली अनुशक्ती ही त्यापेक्षा जास्त महत्त्वाची आहे, हे यांनी लक्षात घेतलं पाहिजे. मुख्य म्हणजे पाकव्याप्त काश्मीर हा भारताचा भूभाग आहे आणि तो भारतात परत मिळवण्याचा उद्देश आमच्या सरकारचा आहे. एक दिवस तो आम्ही नक्की परत मिळवू," असा ठाम विश्वास जयशंकर यांनी व्यक्त केलाय. त्यामुळंच काही लोकांना काश्मीरमध्ये 370 हटवायला नको होतं ते लोकं कोण आहेत हे सर्वांना माहीत आहे, असंही ते म्हणाले. सीएएबद्दल आम्ही ठाम आहोत. आम्ही तो लागू करणारच आहे. तसंच देशाच्या विकासाच्या आड कोण येतंय हे सर्वांना माहीत आहे. बुलेट ट्रेनचा कोण विरोध करत आहे, इंटेल सारखी कंपनी भारतात येत होती, मात्र त्या कंपनीला प्रतिसाद न दिल्यामुळं ती चीनला परत गेली. त्यामुळं भारताच्या विकासाच्या आड काही लोक येत आहेत. मात्र ते कितीही विकासाच्या आड आले तरी भारताचा विकास हा निश्चितच केला जाईल, याची आम्ही खात्री देतो, असंही ते म्हणाले.

चाबहर बंदराबाबत करार : दरम्यान इराण येथील चहाबर बंदराबाबत मंत्री सर्वानंद सोनोवाल हे बैठक घेत आहेत. निश्चितच ते याबाबतची बैठक यशस्वी करतील आणि या बंदरातून व्यापार पुन्हा सुरु होईल. इराण आणि रशिया यांना जोडणारा हे महत्त्वाचं बंदर आहे. त्यामुळं या बंदराबाबत लवकरच चांगली बातमी येईल, असंही जयशंकर यांनी यावेळी सांगितलं. दरम्यान जर भारताचा विकास होणं अपेक्षित असेल जास्तीत जास्त गुंतवणूकदार भारतात यावेत आणि अधिक तांत्रिक विकास व्हावा असं जर वाटत असेल तर भारतात स्थिर सरकार असणं आवश्यक आहे. त्यासाठी मोदी यांना हटवण्याचा जो विरोधकांचा प्रयत्न आहे. त्याऐवजी मोदी यांचं सरकार पुन्हा आणणं आणि हात बळकट करणं हे अधिक महत्त्वाचं असल्याचं त्यांनी यावेळी बोलताना सांगितलं.

हेही वाचा :

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.