ETV Bharat / bharat

पेपर लीक प्रकरणी NTA चे महासंचालक सुबोध सिंग यांची हकालपट्टी, आतापर्यंत 19 जणांना अटक - NEET Paper Leak Case

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 22, 2024, 10:29 PM IST

NEET Paper Leak Case : NEET पेपर लीक प्रकरणात राष्ट्रीय परीक्षा एजन्सीचे (NTA) महासंचालक सुबोध सिंह यांची सरकारनं हाकलपट्टी केलीय. माजी गृहसचिव प्रदीपकुमार खरोला यांच्याकडं एनटीएच्या महासंचालकपदाची जबाबदारी देण्यात आलीय.

NEET Paper Leak Case
NTA चे महासंचालक सुबोध सिंग यांची हकालपट्टी (ETV BHARAT MH Desk)

नवी दिल्ली NEET Paper Leak Case : NEET पेपर लीक प्रकरणातील वादानंतर केंद्र सरकारनं मोठी कारवाई केली आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) चे महासंचालक (DG) सुबोध कुमार यांना पदावरून हटवण्यात आलं आहे. त्यांच्या जागी निवृत्त आयएएस प्रदीप सिंह खरोला यांना एनटीएचे महासंचालक म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. प्रदीप सिंह खरोला हे कर्नाटक कॅडरचे माजी आयएएस अधिकारी आहेत. नुकत्याच झालेल्या NEET पेपर लीक तसंच UGC-NET परीक्षा पेपर फुटीप्रकणात NTA वर सातत्यानं प्रश्न उपस्थित केलं जात आहेत. आता याप्रकरणी मोठी कारवाई करत सरकारनं सुबोध कुमार यांना डीजी पदावरून हटवलं आहे.केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी शनिवारी सांगितलं की, नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA)च्या नीट परिक्षेतील गैरव्यव्हराची चौकशी सुरू आहे.

NEET प्रश्नपत्रिका व्हॉट्सॲपवर : NEET पेपर लीक प्रकरणी पाटणा पोलिसांनी झारखंडच्या देवघर जिल्ह्यातून सहा आरोपींना ताब्यात घेतलं आहे. देवघरच्या देवीपूर पोलीसांच्या मदतीनं पाटणा पोलिसांना मोठं यश मिळालं आहे. या सहा आरोपींमध्ये चिंटू उर्फ ​​बलदेव यांचाही समावेश आहे. ज्याच्या मोबाईलवर 5 मे रोजी सकाळी 9.30 वाजता प्रश्नपत्रिका, उत्तरे व्हॉट्सॲपवर शेअर करण्यात आली होती.

पेपर लीक प्रकरणात झारखंडमधून 6 जणांना अटक : पाटणा पोलिसांनी पंकू कुमार, परमजीत सिंग, चिंटू उर्फ ​​बलदेव कुमार, काजू उर्फ ​​प्रशांत कुमार, अजित कुमार आणि राजीव कुमार यांना ताब्यात घेतलं आहे. पाटणा पोलीस त्याला देवघरहून पाटण्याला घेऊन जाणार आहेत. या संपूर्ण प्रकरणाचा आर्थिक गुन्हे विभाग तपास करत आहे. अन्य आरोपींना ताब्यात घेण्यासाठी पोलीस ठिकठिकाणी छापे टाकत आहेत. या छाप्यात देवघर येथून 6 आरोपींना ताब्यात घेण्यात आलं आहे.

कोर्टात रिमांडसाठी अर्ज : पाटणा पोलील ताब्यात घेतलेल्या 6 आरोपींना न्यायालयात हजर करणार असून त्यांना रिमांडवर घेण्यासाठी अर्ज करणार आहेत. या संपूर्ण प्रकरणात बलदेव यांचं वक्तव्य अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. बलदेवच्या मोबाईलमधील डेटा जप्त करून पोलीस पुरावे गोळा करणार आहेत. यापूर्वीच अटक करण्यात आलेल्या आरोपींनी व्हॉट्सॲपवर पेपर मिळाल्याची कबुली दिली आहे.

आतापर्यंत 19 जणांना अटक : आतापर्यंत सिकंदर यादव, अनुराग यादव, अमित आनंद यांच्यासह एकूण 13 आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यापैकी 5 आरोपी विद्यार्थी आहेत. या प्रकणात आज सहा जणांना अटक केल्यामुळं आरोपींची संख्या 19 वर पोहोचली आहे.

'हे' वाचलंत का :

  1. पेपर फुटला तर आता खैर नाही, होऊ शकतो १ कोटी रुपयांचा दंड, १० वर्षे तुरुंगवास; पेपर लीक विरोधी कायदा लागू - Anti Paper Leak Act
  2. "भाजपा सरकारमध्ये भ्रष्टाचार बोकाळला" : NEET परीक्षा रद्द करण्याची मागणी, पेपरफुटी विरोधात मुंबईत काँग्रेसचे आंदोलन - Chikhal Pheko Aandolan
  3. रशिया-युक्रेन युद्ध थांबवणाऱ्या मोदींना पेपर लीक का थांबवता आलं नाही; भाजपाचा शैक्षणिक संस्थांवर कब्जा - राहुल गांधी - Rahul Gandhi on NEET

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.