ETV Bharat / bharat

Lok Sabha Election 2024 : पहिल्या टप्प्यासाठी निवडणूक आयोगानं जारी केली अधिसूचना ; जाणून घ्या महाराष्ट्रातील निवडणूक प्रक्रियेच्या तारखा

author img

By ANI

Published : Mar 20, 2024, 10:18 AM IST

Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणूक 2024 ची अधिसूचना निवडणूक आयोगानं जारी केली आहे. या अधिसूचनेत महाराष्ट्रातील पहिल्या टप्प्यात होणाऱ्या निवडणुकीच्या तारखांचा उल्लेख करण्यात आला आहे.

Lok Sabha Election 2024
संग्रहित छायाचित्र

नवी दिल्ली Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणूक 2024 ची रणधुमाळी सध्या जोरदार सुरू आहे. राज्यात पाच टप्प्यात लोकसभा निवडणूक होणार आहे. त्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगानं पहिल्या टप्प्यातील निवडणुकीची अधिसूचना बुधवारी जारी केली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगानं उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तारीख जारी केल्यानं राजकीय पक्षांच्या नेत्यांची चांगलीच लगबग सुरू झाली आहे.

'ही' असेल उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तारीख : निवडणूक आयोगानं जारी केलेल्या अधिसूचनेनुसार बिहारमध्ये उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 28 मार्च आहे. तर अरुणाचल प्रदेश, आसाम, छत्तीसगड, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, मणिपूर, मेघालय, मिझोराम, नागालँड, राजस्थान, सिक्कीम, तामिळनाडू, त्रिपुरा, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पश्चिम बंगाल, अंदमान आणि निकोबार बेटे, जम्मू आणि काश्मीर, लक्षद्वीप आणि पुद्दुचेरी आदींसाठी 27 मार्च ही उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख असणार आहे. देशात 19 एप्रिलला पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे.

उमेदवारी अर्ज मागं घेण्यासाठी दिला 'इतका' वेळ : लोकसभा निवडणूक 2024 साठी 19 एप्रिलला महाराष्ट्रासह देशभरातील विविध भागात मतदान होणार आहे. यात उमेदवारी अर्ज भरण्यासाठी निवडणूक आयोगानं तारीख निश्चित करुन दिली आहे. तर उमेदवारी अर्ज छाननी करण्यासाठी बिहारमध्ये 30 मार्च आणि इतर राज्यांसाठी 28 मार्च ही तारीख निवडणूक आयोगानं नेमून दिली.

या तारखेपर्यंत घेता येणार उमेदवारी अर्ज मागं : निवडणूक आयोगानं उमेदवारांना अर्ज मागं घेण्यासाठी तारीख ठरवून दिली आहे. यात बिहार राज्यातील उमेदवारांसाठी 2 एप्रिल ही उमेदवारी अर्ज मागं घेण्याची तारीख असेल. तर महाराष्ट्र, अरुणाचल प्रदेश, आसाम, छत्तीसगड, मध्य प्रदेश, मणिपूर, मेघालय, मिझोराम, नागालँड, राजस्थान, सिक्कीम, तामिळनाडू, त्रिपुरा, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पश्चिम बंगाल, अंदमान आणि निकोबार बेटे, जम्मू आणि काश्मीर, लक्षद्वीप आणि पुद्दुचेरी या राज्यातील उमेदवारी अर्ज मागं घेण्यासाठी 30 मार्च ही तारीख निश्चित करण्यात आली आहे.

हेही वाचा :

  1. BRS Party in Maharashtra : तेलंगणातील सत्ता जाताच 'बीआरएस'ची कार महाराष्ट्रात 'पंक्चर', कार्यकर्त्यांसह नेत्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश
  2. Bala Nandgaonkar : राज ठाकरे-अमित शाह यांच्यात काय झाली चर्चा? बाळा नांदगावकरांनी केला खुलासा
  3. Pawar election symbol tussle : अजित पवार यांना घड्याळ चिन्ह वापरण्यास कोर्टाची सशर्त परवानगी; शरद पवारांना 'तुतारीवाला माणूस' बहाल
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.