ETV Bharat / bharat

सत्तापालट झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी राहुल गांधींंची बिहारमध्ये 'भारत जोडो न्याय यात्रा', काँग्रेसनं आखली रणनीती

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 29, 2024, 10:36 AM IST

Bharat Jodo Nyay Yatra : राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा आज बिहारमधील किशनगंज इथं दाखल झालीय. बिहारमधील राजकीय पेचप्रसंगाच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांचं इथं येणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे.

Bharat Jodo Nyay Yatra
Bharat Jodo Nyay Yatra

पाटणा Bharat Jodo Nyay Yatra : राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा आज बंगालच्या सीमेवरुन बिहारमध्ये दाखल होत आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या आगमनाच्या एक दिवस आधी बिहारमध्ये नवं सरकार आलंय. ही यात्रा बंगालला लागून असलेल्या किशनगंजच्या फरंगोला चौकात सकाळी 9 वाजता पोहोचली. यानंतर राहुल पुढील चार दिवसांत सात जिल्ह्यांचा दौरा करणार आहेत. यापूर्वी राहुल जेव्हा बिहारमध्ये आले होते, तेव्हा सर्व विरोधी पक्षांनी पाटणा येथून भाजपाविरोधात रणनीती बनवण्यास सुरुवात केली होती. यापूर्वी याच भागात नितीशकुमार यांची महत्त्वाची भूमिका होती.

राहुलच्या आगमनापूर्वीच नवीन सरकार : भारत जोडो न्याय यात्रेअंतर्गत राहुल आज बिहारच्या सीमांचलमध्ये दाखल होत आहेत. त्यांच्या स्वागतासाठी काँग्रेसचे सर्व 19 आमदार उपस्थित राहणार आहेत. राहुल यांच्या आधीच बिहारच्या सरकारमध्ये मोठे फेरबदल झाले आहेत. यावेळी नितीश कुमार यांनी भाजपाशी हातमिळवणी केल्यानं विरोधकांच्या ऐक्यामध्ये दुरावा निर्माण झालाय. नितीश कुमार यांनी एनडीएबरोबर सत्ता स्थापन केल्यानं काँग्रेससह महाआघाडीतील इतर घटक पक्ष आता कोलमडले आहेत.

  • आज दलाली करने वालों की इज्ज़त है, काम करने वालों की नहीं।

    भारत तरक्की तभी करेगा जब एक श्रमिक का भी उतना ही सम्मान होगा जितना किसी बड़े उद्योगपति का होता है।

    कामगारों का सम्मान ही रोज़गार की कुंजी है।#BharatJodoNyayYatra pic.twitter.com/X1zfk47N4T

    — Rahul Gandhi (@RahulGandhi) January 29, 2024 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">
  • चार जागांवर राहुल गांधींची नजर : भारत जोडो न्याय यात्रेत राहुल गांधी किशनगंज, कटिहार, पूर्णिया, सासाराम या चार जागा कव्हर करतील. बिहारनंतर त्यांचा प्रवास पुढं झारखंडमध्ये जाणार आहे. झारखंडच्या बहुतांश जागा बिहारच्या सीमेवर आहेत. त्यामुळं या यात्रेचा विशेष प्रभाव पडू शकतो.

राहुल गांधी दुसऱ्यांदा बिहारमध्ये येणार : राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा दोनदा बिहारमधून जाणार आहे. प्रथम ते सीमांचलमधील किशनगंज, अररिया, पूर्णिया, कटिहार या चार लोकसभा मतदारसंघातून झारखंडला रवाना होतील. दुसऱ्या टप्प्यात ते बक्सर, औरंगाबाद, करकट, सासाराम या चार लोकसभा मतदारसंघातून जाणार आहेत. गेल्या निवडणुकीत किशनगंजमध्ये काँग्रेसला महाआघाडीकडून एकमेव जागा मिळाली होती. हे पाहता राहुलची बंगालमधून किशनगंजमध्ये झालेली एन्ट्री महत्त्वाची ठरतंय.

हेही वाचा :

  1. 'भविष्यात जनताच त्यांना धडा शिकवेल'; शरद पवारांचा नितीश कुमारांवर हल्लाबोल
  2. नितीश कुमारांनी नवव्यांदा घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ, राजभवनात 'जय श्री राम'च्या घोषणा
  3. नितीश कुमार यांच्यासोबत 'या' आठ नेत्यांनी घेतली मंत्रीपदाची शपथ; जाणून घ्या त्यांचा राजकीय प्रवास
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.