ETV Bharat / bharat

ऐन लोकसभा निवडणुकीच्या काळात दिलासा; व्यावसायिक सिलिंडरच्या दरात कपात - Commercial Cylinders

author img

By ANI

Published : Apr 1, 2024, 10:42 AM IST

Commercial Cylinders Price : व्यावसायिक गॅस सिलिंडर आणि एफटीएल सिलिंडर वापरणाऱ्यांना मोठा दिलासा मिळालाय. कारण सरकारी तेल कंपन्यांनी या सिलिंडरचे दर कमी करण्याची घोषणा केलीय.

ऐन लोकसभा निवडणुकीच्या काळात सर्वसामान्यांना दिलासा; व्यावसायिक सिलिंडरच्या दरात कपात
ऐन लोकसभा निवडणुकीच्या काळात सर्वसामान्यांना दिलासा; व्यावसायिक सिलिंडरच्या दरात कपात

नवी दिल्ली Commercial Cylinders Price : लोकसभा निवडणुकीचं मतदान सुरू होण्यापूर्वीच सर्वसामान्यांना आजपासून मोठी भेट मिळालीय. सरकारी तेल आणि गॅस मार्केटिंग कंपन्यांनी आज 1 एप्रिलपासून एलपीजी सिलिंडरच्या किमती कमी करण्याची घोषणा केलीय. यामुळं जनतेला दिलासा मिळून महागाई कमी होईल, अशी अपेक्षा आहे.

व्यावसायिक सिलिंडराच्या दरात कपात : सरकारी तेल कंपन्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आजपासून देशातील विविध शहरांमध्ये एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत 30.50 रुपयांपर्यंत कपात करण्यात आलीय. मात्र, या कपातीचा लाभ केवळ 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरवरच मिळणार आहे. घरगुती वापराच्या एलपीजी सिलिंडरच्या किमतीत यावेळी कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

विविध शहरांमध्ये किमती काय आहेत : गॅस सिलिंडरच्या कपातीनंतर दिल्लीत 19 किलोच्या सिलेंडरची किंमत 1,764.50 रुपयांवर आलीय. त्याचप्रमाणे कोलकातामध्ये आजपासून व्यावसायिक एलपीजी सिलिंडर 1,879 रुपयांना उपलब्ध होणार आहेत. या मोठ्या सिलिंडरसाठी मुंबईतील लोकांना आता 1,717.50 रुपये मोजावे लागणार आहेत. तर चेन्नईमध्ये त्याची किंमत आता 1,930 रुपये असणार आहे.

निवडणुकीपूर्वीच कपात : व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीतील ही कपात महत्त्वाची आहे. कारण याच महिन्यात लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचं मतदान होणार आहे. सात टप्प्यांत होणाऱ्या लोकसभा निवडणुका या महिन्यात सुरू होणार आहे. जूनपर्यंत निवडणुकांचा कार्यक्रम सुरू राहणार आहे. यासोबतच सलग तीन महिन्यांपासून सुरू असलेली व्यावसायिक सिलिंडरची दरवाढही थांबवण्यात आलीय.

गेल्या महिन्यातही मिळाला होता दिलासा : मार्च महिन्याच्या सुरुवातीला महिला दिनानिमित्त (8 मार्च 2024) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एलपीजी सिलिंडरच्या किमतीत 100 रुपयांची सूट जाहीर केली होती. तेव्हा घरगुती एलपीजी सिलिंडर ग्राहकांना दिलासा मिळाला होता. त्याच्या एक दिवस आधी म्हणजे 7 मार्चला मोदी सरकारनं एलपीजी सिलिंडरच्या बाबतीत सर्वसामान्यांना दिलासा दिला होता. त्यानंतर मंत्रिमंडळानं 31 मार्च 2025 पर्यंत पीएम उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना 300 रुपये सबसिडी देण्याची घोषणाही केली होती.

हेही वाचा :

  1. उन्हाळ्यात घामाघूम होताय? 'ही' रसदार फळं खावून म्हणाल 'थंडा थंडा कूल कूल' - Fruits Benefits
  2. काय स्वस्त अन् काय महाग? वाचा आजचे क्रिप्टोकरन्सी, पेट्रोल डिझेल, भाजीपाला आणि सोने चांदीचे दर
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.