ETV Bharat / bharat

मैत्रीचा हात पुढे करूनही चिनी नागरिकांवर पाकिस्तानात सातत्यानं हल्ले, यामागे कारण काय? - chinese killed in Pakistan

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 27, 2024, 8:05 AM IST

Updated : Mar 27, 2024, 8:59 AM IST

पाकिस्तानमध्ये चिनी नागरिकांवर सातत्यानं हल्ले होत आहेत. विशेष म्हणजे पाकिस्तानच्या सैन्यदलाकडून चिनी नागरिकांना सुरक्षा दिली जात असतानाही असे हल्ले होत आहेत. पाकिस्तानचे सैन्यदल चीनच्या नागारिकांचे संरक्षण करताना हतबल झाल्याचं दिसत आहे. जाणून घेऊ, पाकिस्तानमध्ये चिनी नागरिकांवर आजवर कधी हल्ले झाले आहेत?

chinese national killed in Pakistan
chinese national killed in Pakistan

हैदराबाद- चीननं २०१५ मध्ये चीन-पाकिस्तान इकॉनिमिक कॉरिडॉरची ( सीपीईसी) घोषणी केली. हा कॉरिडॉर बलुचिस्तानमधून जात असल्यानं तिथं चीनच्या कंपनीकडून काम सुरू आहे. सीईपीसी ही चीनची महत्त्वाकांक्षा असून 'बेल्ट एन्ड रोड' त्याचा महत्त्वाचा भाग आहे. या प्रकल्पातून पाकिस्तानचे ग्वादर बंद चीनच्या जिनजियांग प्रांताला जोडण्यात येणार आहे. मात्र, बलुचिस्तानमधील नागरिकांना पाकिस्तापाठोपाठ चीनची घुसखोरी पसंत पडलेली नाही. त्यामुळे सातत्यानं चीनच्या नागरिकांना लक्ष्य केलं जात आहे.

चीनची नजर खनिजांनी समृद्ध असलेल्या बलुचिस्तानवर आहे. बलुचिस्तानमध्ये तांबे, सोने, नैसर्गिक वायू आणि कोळशांचे विपुल प्रमाण आहे. या प्रांतामधील प्रकल्पांची सुरक्षा करण्याची जबाबदारी पाकिस्तान सरकारनं सैन्यदलाकडं सोपविली आहे. पाकिस्ताननं बलुचिस्तानमधील खाणींवर बेकायदेशीरणे ताबा मिळविला आहे. दुसरीकडं चीनदेखील जिनजियांग प्रांतात मुस्लिमांवर अन्याय करत असल्याचे विविध अहवालातून समोर आले आहे. त्यामुळे जिनजियांग प्रांतात अनेकदा बंड झाल्यानं चीनला सैन्यदलाच्या सामर्थ्याचा वापर करावा लागला आहे. बलुचिस्तानमधील नागरिकांना विशेषत: बलुचिस्तान लिबरेशन आर्मीकडून ( बीएलए) स्वतंत्र बलुचिस्तानची मागणी सात्यानं करते. त्यासाठी अनेकदा बलुचिस्तानमधील नागरिक आणि पाकिस्तानचे सैन्यदल यांच्यांत संघर्ष होतो.

चीनच्या नागरिकांवर आजवर असे झाले आहेत हल्ले

  • 20.3.2024: बलुची नागरिकांनी ग्वादर बंदरगाह येथे बंदूक आणि बॉम्बचा मारा करत हल्ला केला. या घटनेत सात जणांचा मृत्यू झाला.
  • 13.8.2023: 13 अज्ञात हल्लेखोरांनी चीनच्या ताफ्यावर हल्ला केला. हा हल्ला पाकिस्तानमधील दक्षिण-पश्चिमी बलुचिस्तान प्रांतात करण्यात आला. हल्ला एवढा भीषण होता की तीन सुरक्षा कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. सुरक्षा दलानं प्रत्युत्तरात केलेल्या गोळीबारात दोन हल्लेखोर ठार झाले. तीन जखमी झाले आहेत. एकही चिनी नागरिक जखमी झाला नाही.
  • 26 एप्रिल 2022- कराचीमध्ये दहशतवादी महिलेनं आत्मघाती बॉम्बस्फोट घडवून तीन चिनी शिक्षकांची हत्या केली.
  • 14 जुलै 2021- चिनी कामगारांना प्रकल्पात घेऊन जाणाऱ्या बसमध्ये अचानक स्फोट झाला. या भीषण स्फोटात नऊ चिनी नागरिकांचा मृत्यू झाला. इतर चार नागरिकांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर चीनच्या परराष्ट्रमंत्रालयानं तीव्र चिंता व्यक्त केली होती.
  • 29 जून 2020 - बलुचिस्तानच्या विद्रोही नागरिकांनी पाकिस्तानच्या स्टॉक एक्सचेंजवरील हल्ला करून त्याची जबाबदारी स्वीकारली. बलुचिस्तानमधील चीनकडून शोषण करण्यात येणाऱ्या योजनांना विरोध करणं, हा या हल्ल्याचा उद्देश होता.
  • 2019 - ग्वादरमधील पर्ल कॉन्टिनेंटल हॉटेलमध्ये चिनी पर्यटकांवर हल्ला झाला.
  • नोव्हेंबर 2018: तीन बंदूकधारी हल्लेखोरांनी चीनच्या दूतावासावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यात दोन पाकिस्तानी पोलीस आणि दोन नागरिकांची हत्या झाली. या हल्ल्यात तीनही हल्लेखोरांना ठार करण्यात आले.
  • ऑगस्ट 2018: चिनी कामगारांना लक्ष्य करणारा हा पहिला आत्मघाती झाल्यानंतर पाकिस्तानमधील सुरक्षा व्यवस्था चव्हाट्यावर आली. बलुचिस्तानमधील दालबंदिनमध्ये हा हल्ला झाला. हल्ल्यात तीन चिनी अभियंत्यांचा मृत्यू झाला. बीएलए कमांडर अस्लम बलोचच्या मुलानं हा हल्ला घडवून आणला.
  • फेब्रुवारी 2018: कराचीमध्ये चिनी शिपिंग कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याची गोळ्या घालून हत्या करण्यात आली.
  • मे 2017 - दोन चिनी नागरिकांचे अपहरण करून क्वेट्टा येथे त्यांची हत्या करण्यात आली.
  • जुलै 2007 - पेशावरजवळ अज्ञात बंदूकधाऱ्यांनी तीन चिनी कामगारांची हत्या केली. तर एक चिनी नागरिक जखमी झाला.
  • फेब्रुवारी 2006 - सिमेंट कारखान्यात तीन चिनी अभियंत्यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.
  • मे 2004: पाकिस्तानात चिनी नागरिकांवर पहिला हल्ला झाला. बलुचिस्तान लिबरेशन आर्मीच्या आत्मघातकी हल्ल्यात तीन चिनी अभियंते आणि स्थानिक नागरिक ठार झाला. चिनी अभियंते ग्वादर बंदरात काम करत होते.

हेही वाचा-

Last Updated : Mar 27, 2024, 8:59 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.