ETV Bharat / bharat

जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्या घरी सीबीआयची छापेमारी, जम्मू काश्मीरातही 30 ठिकाणी छापे; काय आहे प्रकरण?

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 22, 2024, 12:31 PM IST

CBI Raids On Satyapal Malik : जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्यासह त्यांच्या निकटवर्तीयांच्या 30 ठिकाणांवर सीबीआयनं छापेमारी केलीय. जम्मू काश्मीरच्या किरु हायड्रो पॉवर प्रोजेक्टशी संबंधित कथित गैरव्यवहारप्रकरणी सीबीआयची ही छापेमारी केलीय.

जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्या घरी सीबीआयची छापेमारी
जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्या घरी सीबीआयची छापेमारी

नवी दिल्ली CBI Raids On Satyapal Malik : जम्मू-काश्मीरच्या किरु हायड्रो इलेक्ट्रिक प्रकल्पाशी संबंधित कथित भ्रष्टाचारप्रकरणी सीबीआयनं आज सकाळी माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्याशी संबंधित जम्मू-काश्मीरमधील 30 ठिकाणी छापे टाकले आहेत. हे प्रकरण किश्तवारमधील चिनाब नदीवरील प्रस्तावित किरु जलविद्युत प्रकल्पासाठी 2019 मध्ये 2200 कोटी रुपयांचं नागरी कामाचं कंत्राट देण्याच्या कथित भ्रष्टाचाराशी संबंधित आहे.

मी छाप्याला घाबरणार नाही : सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X (पुर्वीचं ट्विटर) वर एका पोस्टमध्ये सत्यपाल मलिक म्हणाले की, "मी गेल्या तीन-चार दिवसांपासून आजारी असून रुग्णालयात दाखल आहे. असं असतानाही हुकूमशाही सरकारी यंत्रणांच्या माध्यमातून माझ्या घरावर छापे टाकले जात आहेत. माझा ड्रायव्हर आणि माझ्या सहकाऱ्यांवरही छापे टाकले जात आहेत. त्यांना हकनाक त्रास दिला जात आहे. मी शेतकऱ्याचा मुलगा आहे, मी या छाप्याला घाबरणार नाही. मी शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे."

काय आहे प्रकरण : जम्मू काश्मीरच्या किरु हायड्रो पॉवर प्रोजेक्टशी संबंधित गैरव्यवहारप्रकरणी सीबीआयची ही छापेमारी केलीय. या प्रकल्पाच्या फाईलला मंजुरी देण्यासाठी 300 कोटींची लाच देण्याचा प्रयत्न झाला असा आरोप सत्यपाल मलिक यांनी केला होता. किरु जलविद्युत योजना जम्मू काश्मीरच्या किश्तवाडा जिल्ह्यात चिनाब नदीवर प्रस्तावित होणार आहे. या प्रकल्पात प्रत्येकी 156 मेगावॅट क्षमतेच्या 4 युनिट्ससह 135 मीटर उंच धरण आणि भूमिगत वीजगृह बांधण्याची कल्पना आहे.

याआधीही छापेमारी : किरु हाइड्रोइलेक्ट्रिक प्रकल्पाच्या कंत्राट संदर्भात सीबीआयनं छापा मारल्याची ही पहिली वेळ नाही. याआधीही सत्यपाल मलिक यांच्या घर आणि कार्यालयात सीबीआयनं छापेमारी केलीय. मे 2023 मध्येही सीबीआयनं अशाच पद्धतीनं 12 ठिकाणी छापेमारी केली होती. यातील एक ठिकाणी सत्यपाल मलिक यांचा माजी सहकाऱ्याचं होतं. सीबीआयनं त्यावेळी सौनक बाली यांच्या घरी छापेमारी केली होती. ते मलिक यांचे माध्यम सल्लागार राहिले होते. आता सीबीआयनं किरु हाइड्रोइलेक्ट्रिक प्रोजेक्ट संदर्भात 30 ठिकाणी छापेमारी केली आहे. यात सत्यपाल मलिक यांच्या घराचा आणि कार्यालयाचा समावेश आहे.

हेही वाचा :

  1. Satyapal Malik On Lok Sabha Elections : 2019 च्या लोकसभा निवडणुका सैनिकांच्या मुद्द्यावर लढल्याचा सत्यपाल मलिकांचा आरोप
  2. Sanjay Raut on Satya Pal Malik : सत्यपाल मलिक यांची भेट घेणार, जनतेसमोर सत्य यावे- संजय राऊत
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.