ETV Bharat / bharat

लोकसभा निवडणूक 2024 : बसपा प्रमुख मायावती आज नागपुरात घेणार सभा, लोकसभा निवडणूक प्रचाराचा उडवणार 'धुरळा' - Lok Sabha Election 2024

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 11, 2024, 10:55 AM IST

Updated : Apr 12, 2024, 6:59 AM IST

Lok Sabha Election 2024 : बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती या आजपासून लोकसभा निवडणूक 2024 चा प्रचार सुरू करत आहेत. आज नागपुरातून मायावती या प्रचाराचा नारळ फोडणार आहेत.

Lok Sabha Election 2024
बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती

लखनऊ Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणूक 2024 ची रणधुमाळी सगळीकडं सुरू आहे. सर्वच राजकीय पक्ष प्रचारसभा घेण्यासाठी धावपळ करत आहेत. त्यातच आता भाजपा, काँग्रेस, सपा आणि इतर पक्षांच्या बैठका आणि रॅली होत आहेत. त्यातच आता बहुजन समाज पक्षानंही रॅली आणि सभांचं आयोजन केलं आहे. आजपासून बसपा प्रमुख मायावती या महाराष्ट्रातील नागपूर इथून रॅली काढून प्रचाराचा धडाका सुरू करत आहेत. बहुजन समाज पक्षाच्या नेत्या मायावती या नागपुरात येत असल्यानं इतर राजकीय पक्षाच्या नेत्यांचे धाबे दणाणले आहेत.

Lok Sabha Election 2024
बहुजन समाज पक्ष राष्ट्रीय संयोजक आकाश आनंद

आज मायावती करणार नागपुरातील मतदारांना संबोधित : बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती या आज लोकसभा निवडणूक 2024 च्या प्रचाराचा नारळ नागपुरातून फोडणार आहेत. मायावती आज नागपुरात प्रचारसभा घेणार असल्याची माहिती बहुजन समाज पक्षाच्या प्रदेश कार्यालयाकडून देण्यात आली आहे. बहुजन समाज पक्षाच्या नेत्या बहन मायावती या आज नागपुरात येत असल्यानं नागपुरातील इतर पक्षाच्या उमेदवारांमध्ये धाकधूक वाढली आहे.

बहुजन समाज पक्षाच्या वतीनं प्रचाराला सुरुवात : उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री तथा बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती या आज नागपुरात प्रचाराला येत आहेतय तर दुसरीकडं त्यांच्या पक्षाचे राष्ट्रीय संयोजक आकाश आनंद यांनी नगीना लोकसभा मतदारसंघातून 6 एप्रिलपासून प्रचारसभा सुरू केल्या आहेत. लोकसभा निवडणुकीत बहुजन समाज पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ देशभरात मायावती यांच्या जाहीर सभा होणार आहेत. त्या जाहीर सभांची सुरुवात बसपा प्रमुख मायावती या आजपासून नागपूर इथून करणार आहेत, अशी माहिती बहुजन समाज पक्षाच्या प्रदेश कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

इंदोरा परिसरातील बेजनबाग मैदानात होणार सभा : बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांची आज नागपुरातील इंदोरा परिसरातील बेजनबाग मैदानात सभा आयोजित करण्यात आली आहे. ही सभा आज दुपारी होणार आहे, अशी माहिती बसपाच्या वतीनं देण्यात आली आहे. बहुजन समाज पक्षानं देशातील बहुजन समाजाचं व्यापक हित लक्षात घेऊन या लोकसभा निवडणुकीत कोणत्याही पक्षाशी कोणतीही तडजोड केलेली नाही. बहुजन समाज पक्ष ही लोकसभा निवडणूक स्वबळावर पूर्ण ताकदीनं लढवत आहे, असं पक्षाच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलं.

हेही वाचा :

  1. मायावतींची वाढदिवसाच्या दिवशी मोठी घोषणा! लोकसभेच्या 'या' फॉर्म्युलाची केली घोषणा
  2. मायावती राजकारणातून निवृत्तीच्या मार्गावर? २८ वर्षीय पुतण्याकडे सोपवली मोठी जबाबदारी
  3. UP Municipal Election: बॅलेट पेपरवर निवडणुका झाल्या असत्या तर आमचा विजय झाला असता -मायावती
Last Updated :Apr 12, 2024, 6:59 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.