बंगळुरू/ कर्नाटक : Siddaramaiah alleges BJP offered MLAs 50 crores : भाजपा कर्नाटकातील काँग्रेस आमदारांना प्रत्येकी 50 कोटी रुपयांची ऑफर देऊन त्यांच्या गोटात घेण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केला आहे. काही दिवसांपूर्वी हिमाचलं प्रदेशमधील सरकार पाडण्याचे प्रयत्न भाजपाकडून झाले. त्यानंतर लगेच मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आरोप केल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी बंगळुरू येथील रामेश्वरम कॅफेची पाहणी केली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
काँग्रेसचा एकही आमदार भाजपामध्ये जाणार नाही : कर्नाटकचे मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सिद्धरामय्या यांनी आरोप केला की, आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपा आपल्या पक्षाच्या आमदारांना प्रत्येकी 50 कोटी रुपयांचं आमिष दाखवून त्यांची शिकार करण्याचा प्रयत्न करत आहे. ते आज (दि. 2 मार्च) रोजी म्हैसूरमध्ये आले असता पत्रकारांशी बोलत होते. सिद्धरामय्या यांनी दावा केला आहे की, भाजपा काही डावपेच आखत आहे. ज्या माध्यमातून राज्यातील काँग्रेस सरकार पाडू शकतात असा आरोपही त्यांनी केला आहे. मात्र, काँग्रेसचा एकही आमदार भाजपामध्ये जाणार नाही असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केलाय.
सरकार पाडणं ही भाजपाची सवय : भाजपा सध्या राज्यातील काँग्रेस सरकारला हादरा देण्याचा प्रयत्न करत आहे. येथे भाजपाचं जनतेतून सरकार येत नाही. त्यांनी जनतेने निवडून आलेलं सरकार पाडलं आहे. तसंच, सरकार पाडणे ही त्यांची सवय झाली आहे असा घणाघातही सिद्धरामय्या यांनी केला आहे. पुढे म्हणाले की, बेंगळुरू कॅफे स्फोटावर सिद्धरामय्या म्हणाले, हा एक नियोजीत कट आहे. अधिक माहिती समोर येण्यासाठी आम्ही वाट पाहात आहोत असंही ते म्हणाले आहेत.
हेही वाचा :
1 ममता बॅनर्जींनी पंतप्रधान मोदींची घेतली भेट, काय झाली चर्चा?
2 नेपाळमध्ये पुन्हा हिंदूराष्ट्र आणि संवैधानिक राजेशाही स्थापन्याची मागणी; जाणून घ्या काय आहे कारण ?