ETV Bharat / bharat

ओडिशात भाजपा-बीजेडी युती तुटली, भाजपा सर्व जागा स्वबळावर लढवणार - LOK SABHA ELECTIONS

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 22, 2024, 10:32 PM IST

Updated : Mar 22, 2024, 10:50 PM IST

Lok Sabha Election
Lok Sabha Election

Lok Sabha Elections : ओडिशात भाजपा आणि बिजू जनता दल यांच्यातील युती तुटली. दोन्ही पक्षांमधील दीर्घकाळ चाललेली युतीची चर्चा निष्फळ ठरलीय. चर्चा निष्फळ ठरल्यानंतर भाजपानं राज्यात लोकसभा तसंच विधानसभा निवडणुका एकट्यानं लढवण्याची घोषणा केलीय. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष मनमोहन सामल यांनी पक्ष राज्यात एकट्यानं निवडणूक लढवणार असल्याचं स्पष्टपणे सांगितलंय.

ओडिशा Lok Sabha Elections : लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. सात टप्प्यात मतदान होणार आहे. त्यासाठी सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. युती तसंच जागावाटपावर चर्चा सुरू आहे. दरम्यान, ओडिशात मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्याशी भाजपा आघाडीची चर्चा निष्फळ ठरली आहे. यासोबतच आगामी लोकसभा तसंच विधानसभा निवडणुका पक्ष एकट्यानं लढवणार असल्याचं भाजपाकडून जाहीर करण्यात आलं आहे.

भाजपा, बिजू जनता दल युती तुटली : वास्तविक, भारतीय जनता पक्ष आणि बिजू जनता दल यांच्या युतीबाबत अनेक दिवसांपासून राज्यात बैठका सुरू होत्या. लोकसभा आणि विधानसभा निवडणुका दोन्ही पक्ष युतीच्या अंतर्गत लढवणार असल्याची जोरदार चर्चा होती, मात्र त्यांची युती तुटली असून भाजपानं आता एकट्यानं निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे.

कल्याणकारी योजना ओडिशात पोहोचत नाहीत : भाजपाचे प्रदेशाध्यक्ष मनमोहन सामल यांनी सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवर याबाबत घोषणा केली. 'आम्हाला पाठिंबा दिल्याबद्दल आम्ही बिजू जनता दलाचे आभार व्यक्त करतो. देशात जिथं जिथं दुहेरी इंजिनचं सरकार आलं. तिथं विकास कामं झाल्याचा अनुभव आला आहे. पण आज मोदी सरकारच्या अनेक कल्याणकारी योजना ओडिशात पोहोचत नाहीत, त्यामुळं ओडिशातील गरीबांना त्याचा लाभ मिळत नाही'.

भाजपा ओडिशामध्ये सर्व जागा लढवणार : ते पुढे म्हणाले, 'ओडिशाची ओळख, ओडिशा-अभिमान, ओडिशाच्या लोकांच्या हिताशी संबंधित अनेक मुद्द्यांवर आम्हाला चिंता आहे. 4.5 कोटी ओडिशा लोकांच्या आशा, इच्छा, आकांक्षा पूर्ण करण्यासाठी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्ष (भाजपा) यावेळी लोकसभेच्या सर्व 21 आणि विधानसभेच्या सर्व 147 जागांवर एकटाच लढणार आहे.'

युतीची चर्चा निष्फळ : ओडिशामध्ये लोकसभेच्या एकूण 21 आणि विधानसभेच्या 147 जागा आहेत. भाजपा आणि बीजेडी यांच्यात युतीची चर्चा सुरू होती. लोकसभा निवडणुकीत भाजपाला जास्त जागा मिळतील, तर बीजेडीला विधानसभा निवडणुकीत जास्त जागा मिळतील, या आधारावर दोन्ही पक्षांमधील जागावाटपाचा फॉर्म्युला असेल, असं बोललं जात होतं. मात्र, दोघांमधील चर्चा निष्फळ ठरली. त्यामुळं भाजपा आता ओडिशामधील सर्व जागांवर निवडणूक लढवणार आहे.

हे वाचलंत का :

  1. अरविंद केजरीवालांचा मुक्काम ई़डी कोठडीत; 28 मार्चपर्यंत न्यायालयानं सुनावणी कोठडी - Arvind Kejriwal ED Custody
  2. विजय शिवतारेंना पक्षाकडून थेट अल्टीमेटम; युतीधर्म न पाळल्यास कारवाईचा बडगा? नेमकं काय म्हणाले शंभूराज देसाई? - Shambhuraj Desai On Vijay Shivtare
  3. विरोधी पक्षांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी गुप्तहेरांची नेमणूक - Appointment of detectives
Last Updated :Mar 22, 2024, 10:50 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.