ETV Bharat / bharat

पत्नीचा फोन नंबर पतीनं सोशल माध्यमांवर केला शेअर; 'कॉल गर्ल हवी असल्यास फोन करण्याचं आवाहन, गुन्हा दाखल - Bengaluru Crime

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 11, 2024, 5:32 PM IST

Bengaluru Crime
संपादित छायाचित्र

Bengaluru Crime : परदेशात राहणाऱ्या पतीनं पत्नीचा फोन नंबर आणि फोटो सोशल माध्यमांवर शेअर केला. यावेळी पतीनं कॉल गर्ल पाहिजे असल्यास या नंबरवर फोन करण्याचं आवाहन केलं, त्यामुळे पीडितेनं पोलीस आणि राज्य महिला आयोगाकडं धाव घेतली.

बंगळुरू Bengaluru Crime : पत्नीसोबत भांडण झाल्यानंतर पतीनं तिचा फोन नंबर आणि फोटो कॉल गर्लच्या नावानं सोशल माध्यमांवर शेअर केल्याचा आरोप पत्नीनं केल्यानं मोठी खळबळ उडाली. कोणाला कॉल गर्ल हवी असल्यास या नंबरवर कॉल करा, असा मॅसेज पतीनं सोशल माध्यमांवर शेअर केल्याचा आरोप पत्नीनं करत पतीविरोधात तक्रार दाखल केली. पीडित पत्नीनं नंदिनी लेआऊट पोलीस ठाणे आणि राज्य महिला आयोगाकडंही पतीविरोधात तक्रार दाखल केली आहे. पत्नीच्या तक्रारीवरुन पतीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पत्नीचा फोटो आणि फोन नंबर कॉल गर्लच्या नावानं केला शेअर : बंगळुरूतील एका पती आणि पत्नीचा कौटुंबीक कारणातून वाद झाला. या प्रकरणानंतर हे पती आणि पत्नी मागील एका वर्षापासून विभक्त राहत होते. पती आणि त्याच्या कुटुंबीयाकडून मानसिक आणि शारीरिक छळ करण्यात येत असल्याचा आरोप या पीडित पत्नीनं केला. त्यामुळे ती पतीपासून मागील एका वर्षापासून पतीपासून विभक्त राहत होती. पत्नी विभक्त राहत असल्यानं पतीनं तिचा फोटो आणि फोन नंबर सोशल माध्यमांवर कॉल गर्लच्या नावानं शेअर केल्याचा आरोप पीडितेनं केला.

कॉल गर्ल हवी असल्यास फोन करण्याचं आवाहन : पत्नीपासून विभक्त राहत असलेल्या पतीनं त्याच्या पत्नीच्या नावानं सोशल माध्यमांवर अकाउंटचं पेज उघडून त्यावर कॉल गर्ल हवी असल्यास या नंबरवर फोन करण्याचं आवाहन केलं. त्यासह पत्नीचा फोटोही शेअर केला. यासह पीडित पत्नीच्या वडिलांचाही फोन नंबर या सोशल माध्यमांवर शेअर करण्यात आल्याचा दावा पीडितेनं केला. रोज हजारो कॉल येत असून त्यामुळे मानसिक त्रास होत असल्याची तक्रार पीडितेनं नंदिनी लेआऊट पोलीस ठाण्यात आणि राज्य महिला आयोगाकडं केली.

परदेशात राहणाऱ्या पतीनं पॉर्न वेबसाईटवरही नंबर दिल्याचा आरोप : बंगळुरूतील या जोडप्यांचं 2019 मध्ये लग्न झालं होतं. सुरुवातीला या दोघांचा संसार सुरळीत सुरू होता. मात्र मानसिक आणि शारीरिक त्रास होत असल्याचा आरोप करत यातील पीडितेनं पतीपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला होता. मागील एका वर्षापासून ती पतीपासून विभक्त राहत होती. तिचा पती परदेशात राहत असून पीडिता ही भारतात राहत होती. पतीनं आपला नंबर सोशल माध्यमांवर कॉल गर्ल हवी असल्यास या नंबरवर संपर्क साधा असा मॅसेज देऊन शेअर केल्याचा आरोप पीडितेनं केला. त्यासह पतीनं आपला नंबर आणि फोटो पॉर्न वेबसाईटवरही शेअर केल्याचा आरोप पीडित पत्नीनं केला आहे. आता पतीवर कायदेशीर कारवाई करावी, अशी विनंती पीडितेनं पोलीस आणि राज्य महिला आयोगाकडं केली आहे.

हेही वाचा :

  1. युट्युब चॅनेलचे सबस्क्राईब वाढविण्याकरिता शिक्षकानं 'असे' केलं कृत्य, पत्नीसह तुरुंगात झाली रवानगी - YouTube Channel Monetize
  2. ग्रीन कार्डच्या हव्यासापोटी मित्रांबरोबर अदला-बदली करण्याची बळजबरी, अमेरिकेहून परत येताच महिलेची पतीविरोधात तक्रार - Meerut Wife Swapping Case
  3. खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी निघाला बोगस डॉक्टर, दवाखाना चालवायला देणाऱ्या पत्नीलाही अटक - Mumbai Crime News
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.