ETV Bharat / bharat

आपच्या आणखी चार नेत्यांना अटक होणार, भाजपाकडून मला ऑफर... आतिशी यांचा मोदी सरकारवर गंभीर आरोप - Aap minister Atishi

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 2, 2024, 12:25 PM IST

Atishi Big Allegation on BJP: दिल्ली सरकारच्या मंत्री आतिशी यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपा आणि पंतप्रधान मोदी यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. लोकसभा निवडणूक पार पाडण्यापूर्वी भाजपा आणि मोदी यांच्या इशाऱ्यावरून आम आदमी पक्षाच्या ४ नेत्यांना अटक केली जाणार असल्याचा आतिशी यांनी दावा केला.

आतिशी यांची पत्रकार परिषद
आतिशी यांची पत्रकार परिषद

आतिशी यांची पत्रकार परिषद

नवी दिल्ली - दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेनंतर आम आदमी पक्षाच्या चार वरिष्ठ नेत्यांनादेखील अटक होणार असल्याचा दावा मंत्री आतिशी यांनी केला. लोकसभा निवडणुकीपूर्वी मला, भारद्वाज, दुर्गेश पाठक आणि राघव चड्ढा यांना अटक करण्यात येणार आहे, असे सांगत त्यांनी घाबरणार नसल्याचं सांगितलं.

आतिशी म्हणाल्या की, "भाजपाकडून धमकाविलं जात आहे. भाजपाकडून माझ्या जवळच्या व्यक्तीला सांगण्यात आले की, पक्षात सामील होऊन राजकीय करियर वाचवावे. अन्यथा एका महिन्यात ईडीकडून अटक करण्यात येणार आहे. रविवारी रामलीला मैदानावरील गर्दी पाहून भाजपा पक्षातील नेते हैराण झाले आहेत. आप पक्षाच्या नेत्यांना अटक केल्याशिवाय पक्ष संपणार नसल्याचं भाजपा नेत्यांना वाटत आहे. ईडीकडून आम आदमी पक्षाच्या चार वरिष्ठ नेत्यांना अटक केली जाणार आहे. त्यामध्ये मला, सौरभ भारद्वाज, राघव चढ्ढा आणि दिलीप पांडेय यांना अटक केली जाईल.

आम्ही भगतसिंग यांचे शिष्य -"माझ्या घरावर लवकरच छापे पडणार आहेत. त्यानंतर समन्स बजावून अटक करण्यात येईल. मी भाजपाला सांगू इच्छिते की, आम्ही धमक्यांना घाबरणारे नाही. आम्ही अरविंद केजरीवाल यांचे सैनिक आहोत. आम्ही भगतसिंग यांचे शिष्य आहोत. आपच्या प्रत्येक मंत्री, आमदाराला तुरुंगात टाकले तरी घाबरणार नाही. जेवढे लोकांना तुरुंगात टाकाल, तेवढे लोक पुढे येऊन भाजपाला पराभूत करतील," असा विश्वास मंत्री आतिशी यांनी व्यक्त केला.

आम आदमी पक्षाचे नेते तुरुंगात- दिल्लीचे मुख्यमंत्री तथा आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल हे तिहार तुरुंगात कैद आहेत. मद्यधोरण घोटाळ्यात दलालाची भूमिका पार पाडणार विजय नायर हे मला नव्हे तर सौरभ भारद्वाज आणि आतिशी यांना रिपोर्ट करत होते, अशी माहिती मुख्यमंत्री केजरीवाल यांनी न्यायालयात दिली. आम आदमी पक्षाचे मनीष सिसोदिया, संजय सिंह आणि सतेंद्र जैन हे नेते तुरुंगात आहेत.

अरविंद केजरीवाल यांच्या अटकेनंतर काय घडलं?- अरविंद केजरीवाल यांच्या अटकेनंतर जर्मनी, अमेरिका आणि संयुक्त राष्ट्रसंघानं चिंता व्यक्त केली. देशामधील लोकसभा निवडणुका पादर्शकतेनं पार पडाव्यात, अशी भूमिका अमेरिकेनं माडंली. त्यावर देशाच्या परराष्ट्र मंत्रालयानं अरविंद केजरीवाल यांची अटक हा देशांतर्गत मुद्दा असल्याचं स्पष्ट केलं.

हेही वाचा-

  1. अरविंद केजरीवालांच्या अटकेविरोधात रामलीला मैदानावर 'इंडिया आघाडी'ची निदर्शनं; उद्धव ठाकरे, शरद पवार राहणार उपस्थित - INDIA Alliance Protest
  2. केजरीवाल अटक प्रकरणाची जागतिक संस्थेनंही घेतली दखल; अमेरिका-जर्मनी पाठोपाठ संयुक्त राष्ट्रानंही व्यक्त केली चिंता - UN In Support Of Arvind Kejriwal
  3. अरविंद केजरीवाल यांना मुख्यमंत्री पदावरून हटवण्याची याचिका उच्च न्यायालयानं फेटाळली; एक एप्रिलपर्यंत ईडी कोठडीत वाढ - Delhi Liquor Scam Case
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.