Nanded River Protest : गावकऱ्यांनी मुक्तीसंग्राम दिनी नदी पात्रात राष्ट्रगीत गाऊन केला शासनाचा निषेध; पाहा व्हिडिओ

By

Published : Sep 18, 2022, 1:44 PM IST

thumbnail

नांदेड - नांदेडमध्ये नदी पात्रात राष्ट्रगीत गाऊन गावकऱ्यांनी शासनाचा निषेध (villagers protested against government in Nanded) केला. मुक्ती संग्राम दिनी प्रशासनाच्या निषेधार्थ नांदेडमधील धानोरा मक्ता येथील गावकऱ्यांनी नदी पात्रात राष्ट्रगीत (villagers protested by singing national anthem) गायले. नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील धानोरा मक्ता ते गांधी नगर रस्ता तसेच गावातील नदीवर पूल बांधण्याची गावकऱ्याची मागणी आहे. नदीवर पूल नसल्याने पावसाळ्यात नदी पात्रातून गावकऱ्याना, विद्यार्थ्यांना जीवघेना प्रवास करावा लागतो. गेल्या दहा वर्षापासून मागणी करूनही शासन प्रशासन लक्ष देत नसल्याने, निषेध म्हणून आज मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी हे अनोखं आंदोलन करण्यात आले आहे. दरम्यान या मागणीची दखल घेतली गेली नाही, तर येत्या दोन ऑक्टोबर रोजी गांधी जयंती दिनी याच नदी पात्रात आत्मदहन करण्याचा ईशारा गावकऱ्यांनी (goverment protest in Nanded) दिला.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.