Video : वाघासाठी वाहतूक थांबवली; वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी मार्ग केला मोकळा

By

Published : Jul 23, 2022, 10:38 AM IST

thumbnail

चंद्रपूर - चंद्रपूर जिल्ह्यात ( Chandrapur District ) वाघासाठी महामार्गावरील वाहतूक काही काळ थांबविण्यात आली होती. ही घटना नागभीड-ब्रम्हपुरी महामार्गावरील ( Nagbhid-Brahmpuri highway ) सायगाटा येथे घडली. दोन दिवसांपूर्वी दुपारी एक वाघ रस्त्याच्या शेजारी बसला होता. मात्र रस्त्यावरील भरधाव आणि अवजड वाहतुकीमुळे वाघाला रस्ता ओलांडताना अडचणी होत्या. याची माहिती कुणीतरी वनपथकाला दिली. पथकाने महामार्गावर धाव घेत वाहतूक थांबवून वाघोला जाण्यासाठी रस्ता मोकळा ( Clear Road To Tiger ) करून दिला. दोन्ही बाजूची वाहतूक थांबवून वाघोला जाण्यासाठी पुरेसा वेळ दिला. ही कृती लक्षात येताच वाघाने रुबाबात शैलीत महामार्ग ओलांडला आणि वाहतूक सुरळीत झाली.चंद्रपूर जिल्ह्यात वाघ हा विषय नवा नाही, जितके वाघ ताडोबा व्याघ्रप्रकल्प ( Tadoba-Andhari National Park ) येथे आहे. त्यापेक्षा अधिक आजूबाजूच्या परिसरात आहे. त्यामुळे अनेकदा नागरिकांना वाघाचे दर्शन अनपेक्षितपणे होत असते. याबाबतचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल ( viral video ) होत आहे.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.