Tanaji Sawant : अखेर मंत्री तानाजी सावंत यांनी मराठा समाजाची मागितली माफी; म्हणाले...

By

Published : Sep 26, 2022, 1:45 PM IST

Updated : Sep 26, 2022, 1:50 PM IST

thumbnail

राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत हे पुन्हा एकदा एका कारणामुळे चर्चेत आले आहेत. रविवारी उस्मानाबादमध्ये हिंदूगर्वगर्जना संवाद यात्रेदरम्यान आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात सावंत यांची मराठा आरक्षणासंदर्भात भाष्य करताना जीभ (wrong comments regarding Maratha reservation) घसरली. तुम्हाला मराठा आरक्षणाची खाज सत्तांतरण झाल्यानंतर सुटली, अशा शब्दांमध्ये सावंत यांनी विरोधकांना लक्ष्य केलं. यावर आत्ता विरोधकांकडून टीका होत आहे. यावर मराठा क्रांती मोर्चाने आक्रमक भूमिका घेतली आहे. मंत्री तान्हाजी सावंत यांनी जर माफी (Tanaji Sawant apologized) मागितली नाही, तर रस्त्यावर फिरू देणार नाही असा इशारा दिला होता. आत्ता खुद्द मंत्री तान्हाजी सावंत यांनी याप्रकरणी मराठा समाजाची माफी मागितली (Tanaji Sawant apologized to Maratha community) आहे.

Last Updated : Sep 26, 2022, 1:50 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.