Congress workers protest in Chandrapur : केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांच्या ताफ्यासमोर कार्यकर्त्यांची निदर्शने ; इंधन दरवाढीचा निषेध

By

Published : Sep 23, 2022, 4:33 PM IST

thumbnail

केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंग पुरी यांच्या विरोधात काँग्रेस कार्यकर्त्यांनी इंधनदरवाढीसंदर्भात निदर्शने (Congress workers protest against fuel price hike) केली. केंद्र सरकारच्या नाकर्तेपणामूळे देशात इंधन दरवाढीचा भडका उडाला आहे. सर्वसामान्य नागरिकांना या दरवाढीचा मोठा आर्थिक भूर्दंड सोसावा लागत आहे. असा आरोप करत चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने केंद्रीय पेट्रोलियममंत्री हरदीपसिंह पुरी (Union Petroleum Minister Hardeep Singh Puri)यांच्या ताफ्यासमोर निदर्शने करण्यात (protest in front of Union Petroleum Minister) आली. जिल्हाध्यक्ष रितेश (रामू) तिवारी यांच्या नेतृत्वात एन. डी. हॉटेलसमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करीत इंधन दरवाढीचा निषेध नोंदविला. आंदोलनात चंद्रपूर शहर जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्ष संगीता अमृतकर, चंद्रपूर शहर जिल्हा युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेश अडूर, गोपाल अमृतकर, अख्तर (पप्पू) सिद्दीकी, कुणाल चहारे, भालचंद्र दानव, स्वाती त्रिवेदी, चंदा वैरागडे, अॅड. प्रीती शाह, राधिका बोहरा-तिवारी, पूजा अहुजा, ललिता रेवल्लीवार, नौशाद शेख, शाबिर सिद्दीकी, राहुल चौधरी, स्वप्नील चिवंडे, तवंगर खान, मोनू रामटेके यांच्यासह काँग्रेसच्या सर्व फ्रंटल ऑर्गनायझेशनचे पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले (Congress workers protest in Chandrapur) होते.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.