Boat Capsized in Tuticorin : खवळलेल्या समुद्रात बोट उलटली; 11 जणांची..., पाहा VIDEO
Published on: May 13, 2022, 9:10 PM IST

तामिळनाडू - पूर्व किनारपट्टीला चक्रीवादळाचा धोका वर्तवला आहे. मात्र, तरीही काही मच्छीमार समुद्रात मासेमारीसाठी जात आहे. त्यातच आता तामिळनाडूतील तुतीकोरीनमध्ये मच्छीमारांच्या बोटीचा अपघात झाला ( Boat Capsized in Tuticorin ) आहे. या बोटीमध्ये 11 मच्छीमार होते. हे 11 मच्छीमार बोटीतून भूमध्ये समुद्रात शंख आणण्यासाठी गेले होते. मात्र, अचानक आलेल्या वादळामुळे जोरदार वारा वाहू लागला. त्यामुळे समुद्र खवळले आणि ही बोट उलटली. तेव्हा बोटीतून 11 जण समुद्रात पडले. मात्र, त्यांची बोट उलटलेली पाहताच तेथे असणाऱ्या अन्य सहकाऱ्यांनी त्यांची सुखरुप सुटका केली.
Loading...