OBC Reservation : केंद्र सरकारच त्यांच्या लोकांना ओबीसींविरोधात कोर्टात पाठवतं - छगन भुजबळ

By

Published : Dec 16, 2021, 5:07 PM IST

thumbnail

येवला (नाशिक) - बैलगाडी शर्यतीला परवानगी मिळाली याचे स्वागतच आहे. तसेच केंद्राने त्यांच्या लोकांना कोर्टात ओबीसी आरक्षण विरोधात (OBC Reservation) पाठवणे बंद करावे, आरक्षणाबद्दल एवढी काळजी असेल तर ओबीसी आरक्षण मिळवण्याकरता मदत करा, असे मंत्री छगन भुजबळ (Minister Chhagan Bhujbal) म्हणाले. छगन भुजबळ हे आज येवला दौऱ्यावर आले होते. केंद्र सरकारकडे (Center Government) असलेल्या इम्पेरिकल डेटा (Empirical Data) राज्य सरकारला (State Government) देण्यात यावा यासाठी राज्य सरकारकडून करण्यात आलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) फेटाळली आहे. मात्र, केंद्र सरकारने ओबीसींबाबतचा डेटा गोळा केलेलाच नाही, केवळ आर्थिक आणि सामाजिकबाबतीतला डेटा गोळा करण्यात आला. गोळा केलेला डेटा ओबीसी समाजासाठी नाही, असे केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात सांगितले असल्याची माहिती ओबीसी नेते तसेच मंत्री छगन भुजबळ (Minister Chhagan Bhujbal) यांनी दिली.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.