ST Workers Strike : न्यायालयाचा आदेश वाचल्याशिवाय एसटी कर्मचाऱ्यांचा संप मागे घेणार नाही- गुणरत्न सदावर्ते

By

Published : Apr 7, 2022, 10:15 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:22 PM IST

thumbnail

मुंबई- एसटी कर्मचाऱ्यांना 22 एप्रिलपर्यंत कामावर रुजू होण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने आज दिले ( HC Ordered ST Workers Join Duty ) आहे. याशिवाय संपात ( ST Workers Strike ) सहभागी असणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कुठल्याही प्रकारची कारवाई करू नका आणि निवृत्ती वेतन, ग्रॅज्युटी देण्याचे आदेशही मुंबई उच्च न्यायालयाने आज दिले ( HC Order On ST Workers Strike ) आहेत. या आदेशानंतर आज एसटी कर्मचाऱ्यांचा संप मागे होईल, अशी अपेक्षा सर्वत्र व्यक्त केली जात होती. मात्र, कामगारांची बाजू न्यायालयात मांडणारे वरिष्ठ वकील गुणरत्न सदावर्ते ( Adv Gunratna Sadavarte ) यांनी आझाद मैदानावर एक वेगळीच भूमिका मांडली आहे. जोपर्यंत न्यायालयाच्या आदेशाची प्रत वाचत नाही, तेंव्हापर्यत संप मागे घेणार नाही, अशी माहिती आज पत्रकार परिषदमध्ये सदावर्ते यांनी दिली.

Last Updated : Feb 3, 2023, 8:22 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.