Two Youths Drowned : नांदेड शहराजवळ असलेल्या असना नदी पात्रात दोन युवकांचा बुडून मृत्यू

By

Published : Jul 19, 2023, 10:40 PM IST

thumbnail

नांदेड : शहराजवळील आसना नदीत दोन तरुणांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना सायंकाळी पाच वाजता घडली. हे युवक आसना नदीत पोहण्यासाठी आले होते. हे दोघेही तरुण नांदेड शहराजवळील कामठा गावातील रहिवाशी आहेत. राहुल आठवले तसेच साई चूनलवार अशी या तरुणांची नावे आहेत. या दोन्ही तरुणांचा मृत्यू झाला असून त्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. आसना नदीच्या पाणलोट क्षेत्रात पावसामुळे नदीला पूर आला आहे. पुराच्या पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेही पाण्यात बुडाले. आजूबाजूच्या मंडळींनी आरडाओरडा केल्यानंतर स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर प्रशासनाच्या मदतीने तब्बल दोन तासानंतर दोन्ही मुलांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश आले आहे. या घटनेमुळे आसपासच्या परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. 

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.