Video : तीन मित्र धबधब्यात अंघोळ करताना मग्न, तिसरा मित्र गेला वाहून..पहा व्हिडिओ
धर्मशाला : हिमाचल प्रदेशातील धर्मशाला येथील भागसू धबधब्यात 4 मित्र आंघोळीसाठी गेले होते. याचवेळी ओढ्यात पाण्याचा प्रवाह वाढला. अशा स्थितीत स्थानिक नागरिकांनी सर्व तरुणांना पाण्यातून बाहेर येण्यास सांगितलं. चारही मित्र पाण्यातून बाहेर येत असताना त्यांच्यातील एक मित्र पाण्यात वाहून गेल्यानं खळबळ उडालीय. हा तरुण जालंधरहून मॅक्लॉडगंजला मित्रांसह आला होता. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील कारवाई सुरू केली आहे. जालंधरचे रहिवासी अमित कुमार यांनी मॅक्लिओडगंज पोलिसांना सांगितलं की, त्याचे चार मित्र भागसुनाग धबधब्याजवळील ओढ्यात आंघोळ करत होते. यावेळी ओढ्यातील पाणी अचानक वाढलं. त्यामुळं त्याचा मित्र पवन कुमार (वय 32, रा. राजेंद्र कुमार, रा. जालंधर) हा वाहून गेला. SDRF कांगडा आणि स्थानिक पोलिसांच्या पथकाने बेपत्ता तरुणाचा शोध घेत धबधब्याच्या 200 मीटर खालून तरुणाचा मृतदेह बाहेर काढला.