Sushma Andhare On Fadnavis : 'त्या' प्रकरणी देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलण्याची इच्छा नाही - सुषमा अंधारे

By

Published : Jun 1, 2023, 6:57 PM IST

thumbnail

पुणे : शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी काही दिवसांपूर्वी शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांच्याविरोधात छत्रपती संभाजीनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या प्रकरणात संजय शिरसाटा यांना क्लीन चिट मिळाल्याचे बोलले जात आहे. याबाबत सुषमा अंधारे यांनी मत व्यक्त केले आहे. राज्याचे गृहमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलण्याची इच्छा नसल्याचे त्या म्हणाल्या. त्या आमदाराला क्लीन चिट कशी दिली? एक वकील म्हणून तुम्ही मला मार्गदर्शन करू शकाल का? असा सवाल त्यांनी फडणवीस यांना विचाराला आहे. एखाद्या प्रकरणासाठी एसआयटी नेमली असेल तर, एकीकडूनच चौकशी का? नियुक्त अधिकारी पुरुष की महिला हे माहीत नाही. त्यामुळे वकिल देवेंद्र फडणवीसांनी मला समजावून सांगावे असे अंधारे म्हणाला.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.