Sunil Kawale Funeral : सुनील कावळे यांच्या अंत्यविधीसाठी आलेल्या आमदाराला मराठा समाजानं दाखवला घरचा रस्ता; पाहा व्हिडिओ

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 20, 2023, 5:23 PM IST

thumbnail

छत्रपती संभाजीनगर : Sunil Kawale Funeral :  मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुनील कावळे यांनी आत्महत्या केली. त्यांच्यावर मुकुंदवाडी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले; (MLA Bagde sent back) मात्र त्यावेळी आलेल्या राजकीय नेत्यांना मराठा क्रांती मोर्चा समन्वयकांनी परत जाण्यास भाग पाडले. (Sunil Kawale funeral) भाजपा आमदार हरिभाऊ बागडे (BJP MLA Haribhau Bagde) अंत्यविधीस उपस्थित राहण्यासाठी आले असता, त्यांना जमलेल्या कार्यकर्त्यांनी परत जायला सांगितले. 'गो बॅक.. गो बॅक...' अशी घोषणाबाजी त्यांनी सुरू केली. (MLA Bagde sent back from Sunil Kawale funeral) त्यांना हरिभाऊ बागडे यांनी समजून सांगण्याचा प्रयत्न केला असता, कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर रोष व्यक्त केला. मराठा आरक्षण मिळेपर्यंत कुठल्याही नेत्यांनी अशा ठिकाणी येऊ नये, अशी ताकीद यावेळी देण्यात आली. (Sunil Kawale Suicide case) तर वातावरण शांत राहावं याकरिता मी परत जात आहे, अशी माहिती हरिभाऊ बागडे यांनी दिली. अंत्यविधीच्या वेळी कोणत्याच राजकीय नेत्यांनी स्मशानभूमीत थांबू नये, असा इशारा कार्यकर्त्यांनी दिला.

ABOUT THE AUTHOR

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.