Ganeshotsav 2022 : कराडमध्ये घरगुती गणपतीसमोर साकारला शाहिस्तेखानाची बोटं छाटल्याचा देखावा; पाहा व्हिडिओ

By

Published : Sep 3, 2022, 9:58 AM IST

Updated : Feb 3, 2023, 8:27 PM IST

thumbnail

लाल महाल म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊंच्या आठवणींचे स्मारक आणि प्रेरणास्थान. इतिहासातील अशा अनेक प्रसंगांवर गणेशोत्सवात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून देखावे सादर केले Ganeshotsav 2022 जातात. परंतु, कराडमधील विनय कांबळे यांनी आपल्या घरगुती गणपती समोर शिवाजी महाराजांनी शाहिस्तेखानाची बोटं कशी छाटली, या प्रसंगावर आधारित पर्यावरणपूरक साहित्याचा वापर करून ऐतिहासिक देखावा सादर केला Shahistekhan fingers being cut off decoration for Ganesha आहे. कागदी पुट्ट्यापासून लाल महालाची प्रतिकृती तयार केली replica of Lal Mahal in satara आहे. लाल महालामध्ये पाहारा देणारे मातीचे सैनिक उभे केले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांची मातीची आणि क्लेपासून बनविलेली शाहिस्तेखानाची मुर्ती महालात ठेवण्यात आली आहे. शिवाजी महाराजांनी ज्या चातुर्याने लाल महालात घुसून शाहिस्तेखानाची बोटे छाटली, तो प्रसंग सांगणारा ऑडिओ देखील तयार केला आहे. हा ऐतिहासिक देखावा कराडमध्ये चर्चेचा ठरला आहे.

Last Updated : Feb 3, 2023, 8:27 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.