जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणकर्त्याचा आत्मदहनाचा प्रयत्न

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 8, 2023, 10:48 PM IST

thumbnail

जालना Self Immolation Attempt : जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एका उपोषणकर्त्यानं आत्मदहनाचा प्रयत्न केलाय. बदनापूर तालुक्यातील ढोकसाळ या गावातील रोजगार हमी योजनेच्या कामात 40 लाखांचा भ्रष्टाचार झाला होता. (Jalna Collectorate) त्यामुळं याची चौकशी व्हावी यासाठी प्रहार संघटनेचे कार्यकर्ते संजय रामकृष्ण जाधव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसले होते; मात्र तरीही प्रशासन दखल घेत नव्हते. त्यामुळं हतबल झालेल्या या उपोषणकर्त्यानं थेट जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच आत्मदहनाचा प्रयत्न केलाय. पोलिसांनी वेळीच त्याला रोखल्यानं मोठा अनर्थ टळला आहे. (Corruption in Employment Guarantee Scheme) रोजगार हमी योजनेमध्ये काही ठिकाणी भ्रष्टाचाराची प्रकरणे यापूर्वीही उघडकीस आली आहेत. त्यामुळे या योजनेचा लाभ केवळ कागदोपत्री लोकांना देण्यात येतो. प्रत्यक्ष ते लोक अस्तित्वात नसल्याचं काही ठिकाणी आढळलं आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.