आर जे संग्राम 'या' मतदार संघातून लढवणार लोकसभा निवडणूक, 'या' पक्षातून असणार उमेदवारी

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 17, 2024, 6:33 PM IST

thumbnail

पुणे RJ Sangram Khopde : यावर्षी देशात लोकसभा निवडणूक होणार आहे. यासाठी विरोधकांच्या वतीनं 'इंडिया' आघाडी करण्यात आली आहे. (Pune LokSabha Constituency) तर महायुतीकडून देखील लोकसभा निवडणुकीची जोरदार तयारी करण्यात आली आहे. (India Alliance) पुणे लोकसभेसाठी देखील जोरदार तयारी सत्ताधारी भाजपा आणि काँग्रेस पक्षाकडून करण्यात आली आहे. (Congress Party) पुण्यात काँग्रेसकडून देखील 20 इच्छुक उमेदवारांची नावं समोर आली आहेत. (Lok Sabha Election 2024) अशा उमेदवारांमध्ये जरी आजी माझी आमदार असले तरी त्यात एका नावाची जोरदार चर्चा सुरू आहे ते नाव म्हणजे आर जे संग्राम खोपडे. आर जे संग्राम यांनी काँग्रेस पक्षाकडून पुण्यातून लोकसभा निवडणूक लढवण्याची तयारी दर्शविली आहे आणि मी पुणे लोकसभा निवडणूक लढविण्यास इच्छुक असल्याचं यावेळी त्यांनी सांगितलं आहे. याबाबत आमचे प्रतिनिधींनी आर जे संग्राम यांच्याशी खास बातचीत केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.