Pune Gangsters Arrested  कोयत्याने दहशत माजविणाऱ्या सराईतांच्या आवळल्या मुसक्या

By

Published : Jan 4, 2023, 4:30 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:38 PM IST

thumbnail

पुणे पुणे शहरात विविध ठिकाणी कोयता गँगने दहशत terror of Koyta Gang माजवली आहे. पुण्यातील सिंहगड कॅम्पस येथे दहशत माजवणाऱ्या दोन जणांना अटक Pune Gangsters Arrested करून त्यांची वरात काढलेली घटना ताजी असताना पुण्यातील नाना पेठ येथे कोयते घेऊन दहशत माजवणाऱ्या 5 जणांच्या समर्थ पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहे. ०१ जानेवारी २०२३ च्या पहाटे काही इसमांची आपसात भांडणे झाली होती. त्या भांडणाचा राग मनात धरून काही सराईत गुन्हेगारांनी हातात कोयते घेऊन नवावाडा भागात दहशत निर्माण केली होती. या प्रकरणी पोलिसांनी तत्काळ याची दखल घेत आरोपींना अटक Koyta Gang Arrest केली आहे. या आरोपींच्या दहशतीची नागरिकांनी न घाबरता पोलिसांना माहिती द्यावी. Latest news from Pune त्यावर पुणे पोलीस कोणत्याही गुन्हेगारांची गय न करता नक्कीच कठोर कारवाई करण्यात येईल, असे आवाहन समर्थ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश साठे यांनी केले आहे. Pune Crime

Last Updated : Feb 3, 2023, 8:38 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.