Pimpri Chinchwad Bandh: मराठा आंदोलनाला पाठिंबा; आज पिंपरी चिंचवड शहर कडकडीत बंद, पाहा व्हिडिओ

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 9, 2023, 5:18 PM IST

thumbnail

पिंपरी चिंचवड Pimpri Chinchwad Bandh : राज्यात मराठा आरक्षणावरून राजकीय वातावरण तापलं आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालन्यात मनोज जरांगे यांच्या आमरण उपोषणाचा आज ११ वा दिवस (Maratha Protest Manoj Jarange Patil) आहे. मागील आठवड्यात या आंदोलनाला गालबोट लागलं. पोलिसांनी आंदोलकांवर लाठीमार केलाय. यामध्ये अनेक आंदोलक गंभीररित्या जखमी झालेत. मराठा आरक्षण आणि मराठा क्रांती मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी 'पिंपरी चिंचवड शहर बंद'ची हाक देण्यात आलीय. शहरातील सर्व परिसरामध्ये कडकडीत बंद पुकारण्यात आलाय. यामध्ये अनेक व्यापारांनी आणि उद्योजकांनी सहभाग घेत दुकाने बंद ठेवली. पिंपरी कॅम्प, भाटनगर येथून मोर्चा काढण्यात आला. एक मराठा लाख मराठा, आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं, एकच मिशन मराठा आरक्षण, अशा घोषणा देत पिंपरीत आंदोलन करण्यात आलं. मोर्चाला पाठिंबा दर्शवण्यासाठी अनेक मराठा कार्यकर्ते उपोषणाला बसले आहेत. या आंदोलनामध्ये (support to Maratha Protest) आज सर्वपक्षीय कार्यकर्ते आणि नेते सहभागी झालेत. सत्ताधारी भाजपा, राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना, काँग्रेस यासारख्या सर्वपक्षीय स्थानिक नेत्यांनी एकत्र येत आंदोलनाला पाठिंबा दिलाय. 

ABOUT THE AUTHOR

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.