Priyanka Chaturvedi on Manipur Violence: त्या इतर '100 महिला आणि त्यांच्या एफआयआर'चे काय? प्रियंका चतुर्वेदींचा मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांना सवाल

By

Published : Jul 21, 2023, 12:20 PM IST

thumbnail

नवी दिल्ली : उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या प्रियंका चतुर्वेदी यांनी मणिपूर हिंसाचार व्हिडिओ प्रकरणी अटकेवर मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे.  मणिपूरमध्ये दररोज अशा 100 केसे येत आहेत, असे मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंग यांनी गुरूवारी स्वत: माध्यमांशी बोलताना सांगितले होते. 18 मे रोजी एफआयआर दाखल करण्यात आला होता. ती शून्य एफआयआर होती. मला खात्री आहे की, पोलिसांकडे हा व्हिडिओ आहे. परंतु, 18 मेपासून आजपर्यंत आम्ही त्यावर कोणतीही कारवाई न करता निष्क्रिय बसलो आहोत. आता हा व्हिडिओ लीक होऊन व्हायरल झाल्याने त्यांनी ही कारवाई केली आहे, आतापर्यंत यासारख्याच जवळपास 100 एफआयआर नोंदवण्यात आल्या आहेत. तर त्या इतर 100 महिला आणि त्यांच्या एफआयआरचे काय? असा सवाल मणिपूर व्हायरल व्हिडिओवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी विचारला आहे. आता या प्रकरणात झालेली अटक ही केवळ कायदा आणि सुव्यवस्था अस्तित्वात असल्याचे दाखवण्यासाठी आहे, त्या म्हणाल्या आहेत.  

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.