NCP Ccelebrated Gaddar Divas: पुण्यात आज '50 खोके एकदम ओके' म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसने साजरा केला गद्दार दिवस, शहराध्यक्ष म्हणाले...

By

Published : Jun 20, 2023, 12:02 PM IST

thumbnail

पुणे : 50 खोके एकदम ओके म्हणत, राष्ट्रवादी काँग्रेसकडून गद्दार दिवस साजरा करण्यात आला आहे. आजपर्यंत महाराष्ट्र राज्यामध्ये आम्ही मदर्स डे, डॉक्टर डे तसेच विविध डे साजरे केले, पण आज पहिल्यांदाच महाराष्ट्राची जनता गद्दार दिवस साजरा करत आहे, असे म्हणत आज राष्ट्रवादी काँग्रेसकडून पुण्यातील बालगंधर्व चौकात गद्दार दिवस साजरा करण्यात आला आहे. यावेळी बालगंधर्व चौकात रिकामे खोके आणून जोरदार घोषणाबाजी करत मोठ्या संख्येने कार्यकर्ते हे उपास्थित होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले की, आज बरोबर एक वर्षापूर्वी राज्याच्या राजकारणात शिवसेनेतून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या 40 आमदारांनी बंड केले होते. राज्यात प्रथमच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या मदतीने बंड करत महाराष्ट्राची राजकीय संस्कृती संपवण्याचा प्रयत्न केला आहे. राज्याच्या या 40 आमदारांनी 50 कोटी घेऊन ते विकले गेले आहे. त्यांनी राज्याच्या संस्कृतीशी आणि पक्षाची गद्दारी केली म्हणून आज आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने गद्दार दिवस साजरा करत आहे, असे यावेळी जगताप म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.