Navratri 2023: बीडच्या खंडेश्वरी माता मंदिरात नवरात्रोत्सव उत्साह; दर्शनासाठी भाविकांची गर्दी...पाहा व्हिडिओ

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 22, 2023, 10:14 PM IST

thumbnail

बीड Navratri  2023 :  सध्या देशभरात मोठ्या उत्साहात नवरात्री साजरी होत (Navratri Festival In Beed) आहे. बीड जिल्ह्यातील 400 ते 500 वर्षापूर्वीचे पुरातन मंदिर आहे. ग्रामदैवत श्री खंडेश्वरी मोतेच्या शारदीय नवरात्र उत्सवास घटस्थापनेने प्रारंभ झाला. यंदा नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. या ठिकाणी अनेक भक्तांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होतात. दसरा जवळ आला की, बीडकरांना वेध लागतात ते खंडेश्वरी नवरात्रोत्सवाचे. (Khandeshwari Navratri Festival) शहरात पूर्वेला टेकडीवर विसावलेल्या खंडेश्वरीमातेची नवसाला पावणारी देवी म्हणून तिची ख्याती आहे. मागील तीन वर्षांमध्ये कोविडचे सावट असल्यामुळे सार्वजनिक सण उत्सवावर निर्बंध होते. परंतु, आता हे सावट दूर झाल्याने भक्तांमध्ये उत्साह संचारला आहे. डोंगराळ परिसरात वसलेल्या खंडेश्वरी देवी मंदिरात नवरात्रोत्सवानिमित्त जत्रेचे स्वरूप आलेले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.