26/11 दहशतवादी हल्ला : मुंबई पोलीस आयुक्तालयात हुतात्म्यांना मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांसह राज्यपालांची मानवंदना, पहा व्हिडिओ

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 26, 2023, 10:53 AM IST

Updated : Nov 26, 2023, 12:27 PM IST

thumbnail

मुंबई 26/11 Mumbai Terror Attacks : 26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबईत झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याला आज 15 वर्षे पूर्ण झाली. या निमित्तानं मुंबईत आज अनेक ठिकाणी या हल्ल्यामध्ये मृत्यूमुखी पडलेल्या पोलीस अधिकारी आणि जवानांना मानवंदना देण्यासाठी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. याच पार्श्वभूमीवर आज मुंबईच्या पोलीस आयुक्त कार्यालयात दहशतवादी हल्ल्यामध्ये मृत्यू झालेल्या पोलीस अधिकारी आणि जवानांना मानवंदना देण्यासाठी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. यावेळी राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तसंच गृहमंत्री देवेंद्र फडवणीस, मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा, पोलीस महासंचालक ब्रिजेश सिंह, मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर या सर्वांनी हुतात्मा जवानांना आणि पोलीस अधिकाऱ्यांना मानवंदना दिली.

Last Updated : Nov 26, 2023, 12:27 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.