Ajit Pawar Supriya Sule Bhaubeej : उत्सव नात्यांचा...सुप्रिया सुळे यांनी केलं अजित पवार याचं भाऊबीजला औक्षण; पाहा व्हिडिओ
पुणे Ajit Pawar Supriya Sule Bhaubeej : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी बंड केल्यानंतर दोन्ही कुटुंब एकत्र येणार का? अशी चर्चा होती. गेल्या कित्येक वर्षापासून पवार कुटुंबाची दिवाळी (Diwali 2023) ही काटेवाडीत होत असते. गाठीभेटी घेत आणि एकत्र उत्सव साजरा करण्याची पवार कुटुंबाची परंपरा आहे. यावर्षी मात्र अजित पवार आणि शरद पवार यांनी वेगळ्या राजकीय भूमिका घेतल्यानं, प्रत्येकाच्या मनात अशी शंका होती की, हे कुटुंब एकत्र येणार का? त्यानंतर दिवाळीत अजित पवार पुण्यातल्या बाणेर येथील त्यांच्या बंधूंच्या घरी एकत्र दिसले.
सुप्रिया सुळे आणि अजित पवार भाऊबीज : मंगळवारी रात्री अजित पवार यांनी गोविंद बागेत जात स्नेह भोजनाच्या सुद्धा कार्यक्रम केला. तर आज भाऊबीज अजित पवार यांच्या घरामध्ये साजरी करण्यात आली. अजित पवार यांच्या घरामध्ये आज सुप्रिया सुळे या भाऊबीजेसाठी दाखल झाल्या होत्या. तसंच शरद पवार सुद्धा दाखल झाले होते. इतर पारंपरिक सणाप्रमाणे पवारांच्या घरात सुद्धा भाऊबीज साजरी करण्यात आली. यावेळी खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी अजित पवार यांचं औक्षण केलं.