Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी वकिलाचा आत्महदनाचा प्रयत्न, पाहा व्हिडिओ

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 8, 2023, 11:07 PM IST

thumbnail

जालना Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी ॲड. मारोती भाऊसाहेब वाडेकर यांनी जालना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात आत्मदहनाचा प्रयत्न केला. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात त्यांनी अंगावर डिझेल ओतून स्वत:पेटवण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. अंतरवली सराटी येथे मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी गेल्या 11 दिवसांपासून मनोज जरांगे पाटील यांचं शांततेत उपोषण सुरू आहे. मात्र, प्रशासनाच्या वतीनं कोणताही निर्णय न झाल्यानं संतप्त झालेल्या मारोती भाऊसाहेब वाडेकर यांनी अखेर टोकाचे पाऊल उचलत आत्मदहनाचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी मध्यस्थी करून त्यांना रोखल्यामुळं मोठा अनर्थ टळला.  जालना पोलिसांनी ॲड. मारुती वाडेकर यांना ताब्यात घेतले असून त्यांच्यावर जालना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. यावेळी गोपनीय शाखेचे सय्यद शौकत, तालुका पोलीस ठाण्याचे सुनील गणगे यांच्यासह पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

ABOUT THE AUTHOR

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.