Sambhaji Brigade News : 'अन्यथा नेत्यांना महाराष्ट्रात जनता फिरू देणार नाही', संभाजी ब्रिगेडचा इशारा
पुणे Sambhaji Brigade News : राज्यात गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणाचा विषय गाजत असून मनोज जरांगे पाटील यांनी 24 डिसेंबर पर्यंत सरकारला आरक्षण देण्याचा अल्टिमेटम दिला आहे. एकीकडं मराठा आरक्षणाचा विषय चर्चेत असताना, आता ओबीसींची जातनिहाय जनगणना झाली पाहिजे ही मागणी सर्व आमदारांनी महाराष्ट्रात लावून धरावी. अन्यथा सगळ्यांना गावबंदी अटळ आहे, असा इशारा संभाजी ब्रिगेडनं दिला आहे. यासंदर्भात बोलताना संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते संतोष शिंदे म्हणाले की, मी मागील काही दिवसांपासून मराठवाड्यात फिरतोय. सगळ्या लोकांची प्रामाणिक इच्छा आहे की आमची लोकसंख्या आम्हाला कळू द्या आणि त्याच प्रमाणात आरक्षण मिळू द्या. महाराष्ट्रात ओबीसींची जातनिहाय जनगणना झाली पाहिजे. अन्यथा नेत्यांना महाराष्ट्रात जनता फिरू देणार नाही.
Loading...