Maharashtra Politics Crisis: अजित पवार यांच्या भूमिकेवर ज्येष्ठ कार्यकर्ते आक्रमक...म्हणाले ही रावणाची भूमिका

By

Published : Jul 3, 2023, 12:04 PM IST

thumbnail

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी बंड केल्यानंतर राष्ट्रवादी पक्षात उभी फूट पडली आहे. अजित पवार यांच्यासोबत तब्बल 40 आमदार त्यांच्यासोबत असल्याचा दावा करण्यात येत आहे. मात्र अजित पवार यांच्या बंडाबाबत शरद पवार रान उठवणार असल्याचे दिसून येत आहे. थोड्याच वेळात पवार हे कराड येथील प्रितीसंगमावर जाऊन यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचे दर्शन घेणार आहेत. पुण्यातील मोदी बाग येथील त्यांच्या निवास्थानी मोठ्या संख्येने ज्येष्ठ तसेच तरुण कार्यकर्ते हे जमले होते. आम्ही सदैव पवार साहेबांच्या सोबत असल्याचे सांगत होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे पुण्यातील त्यांच्या निवासस्थानाहून कराड येथे निघाले आहे. यावेळी त्यांच्या सोबत आमदार रोहित पवार, संदीप क्षीरसागर खासदार वंदना चव्हाण हे देखील उपस्थित होते. मोठ्या संख्येने ज्येष्ठ तसेच तरुण कार्यकर्ते देखील उपस्थित होते. यावेळी ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी अजित पवार यांनी घेतलेल्या भूमिकेवर टिका करत ही भूमिका रावणाची भूमिका असल्याचे सांगितले आहे. यावेळी माजी अध्यक्ष रवींद्र आण्णा माळवदकर, माजी महापौर शांतीलाल सुरतवाला, शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी संवाद साधला. 

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.