PM Modi Nilavande Dam : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते निळवंडे धरणाचं जलपूजन; पाहा व्हिडिओ

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 26, 2023, 5:09 PM IST

Updated : Oct 26, 2023, 6:05 PM IST

thumbnail

अहमदनगर (अकोले)  PM Narendra Modi Nilavande Dam : अहमदनगर जिल्ह्यातील निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्याचं जलपूजन करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कालव्यातून पाणी सोडलंय. यावेळी राज्यपाल रमेश बैस, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील निळवंडे धरण प्रकल्पामुळे जिल्ह्यातील सहा दुष्काळी भागातील पाणीटंचाईचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. अकोले, संगमनेर, राहाता, श्रीरामपूर, कोपरगाव, सिन्नर (नाशिक) तालुक्यातील शेतजमीन ओलीताखाली येणार आहे. सिन्नर तालुक्यातील 6 गावातील 2 हजार 612 हेक्टर शेतजमीन व्यतिरिक्त अहमदनगर जिल्ह्यातील 66 हजार 266 हेक्टर शेतजमीन ओलिताखाली येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुपारी शिर्डी साईबाबा समाधी मंदिरात दर्शन घेतलं. मंदिरातील नवीन दर्शन रांग संकुलाचं उद्घाटनही पंतप्रधान मोदींनी केलंय. 

Last Updated : Oct 26, 2023, 6:05 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.