Udayanraje Bhosale : तीन गोल किपर्सना चकवा देत उदयनराजेंनी केला गोल; पाहा व्हिडिओ
Published: May 24, 2023, 10:59 PM

सातारा : खासदार उदयनराजे भोसले यांच्या प्रयत्नातून अनेक विकासकामे मंजूर झाली आहेत. स्वतः उदयनराजे शहरात फिरून कामांचा आढावा घेत आहेत. याच अनुषंगाने शाहूनगरमधील एका फुटबॉल मैदानाची पाहणी करत असताना चाहत्यांनी उदयनराजेंना फुटबॉलला किक मारण्याचा आग्रह केला. यावेळी उदयनराजेंनी गोलकीपर म्हणून आपल्या तीन कार्यकर्त्यांना उभे केले. माझे नवे रूल्स आहेत. हात आणि पाय न लावता बॉल अडवायचा, अशी अट घातली. एकाच किकमध्ये तीन गोलकिपर्सना चकवत उदयनराजेंनी गोल केला. किक मारल्यानंतर 'बच्चा समझ के छोड दिया', असा डायलॉगही त्यांनी मारला. आपणास फुटबॉल गेम खूप आवडतो असेही ते म्हणाले. उदयनराजे भोसले यांनी घेतला फुटबॉल खेळण्याचा आनंद लुटला आहे. यावेळी चाहते देखील उपस्थित होते.
Loading...