Gas Cylinders Truck Accident : गॅस सिलिंडरने भरलेला ट्रक उलटला, स्फोटाच्या आवाजानं हादरलं गाव

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 18, 2023, 7:50 PM IST

thumbnail

हमीरपूर (हिमाचल प्रदेश) Gas Cylinders Truck Accident : हिमाचल प्रदेशातील हमीरपूर जिल्ह्यातील सुजानपूरच्या जंगलबारी परीसरात सोमवारी सकाळी घरगुती गॅस सिलिंडरनं भरलेला एक ट्रक उलटून मोठा अपघात झालाय. या अपघातात ट्रकमध्ये भरलेल्या गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्यानं संपूर्ण गाव भयभीत झालं होतं. हा ट्रक नियंत्रणाबाहेर जाऊन विजेच्या खांबाला धडकला. त्यानंतर शेतात पलटी झाल्याचं तपासात समोर आलंय. ट्रकमध्ये काही सिलिंडर शिल्लक असल्याचेदेखील तपासात समोर आले आहे.  विद्युत खांबाच्या शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातोय. या ट्रकमध्ये सुमारे 294 घरगुती गॅस सिलिंडर होते, त्यापैकी 18 डझन सिलिंडरचा स्फोट झाला. सुदैवानं या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. या ट्रकला आग लागल्याने परिसरात धुरांचे लोट उठले होते. (LPG gas Cylinder Truck overturns in Hamirpur)

ABOUT THE AUTHOR

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.