Ganesh Festival 2023 : पर्यावरण पूरक बाप्पा म्हणून गिरगावच्या राजाची ओळख; भाविकांची होतेय गर्दी

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 23, 2023, 9:27 PM IST

thumbnail

मुंबई Ganesh Festival 2023 : गिरगावच्या मानाच्या गणपतीपैकी एक गणपती म्हणून गिरगावच्या राजाची ओळख आहे. गिरगावच्या राजाची झलक पाहण्यासाठी मुंबई आणि उपनगरातून भाविक भक्त येत असतात. पर्यावरण पूरक गणपती अशी ख्याती या राजाची आहे. 96 वे वर्ष गिरगावचा राजा मंडळ साजरा करत आहे. यावर्षी मंडळाकडून शिवराज्याभिषेक सोहळ्याचे औचित्य साधून देखावा तयार करण्यात आला आहे. मंडळाचे उपाध्यक्ष प्रमोद राणे यांनी याविषयी माहिती दिली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेक सोहळ्याला यंदा 350 वर्ष पूर्ण होत आहेत. हीच संकल्पना घेऊन छत्रपती शिवाजी महाराज आज असते तर त्यांनी काय केले असते, अशा प्रकारच्या संकल्पनेचा वापर करत विविध चित्र रेखाटली आहेत. तसेच 48 भाषेतील महाराजांची राजमुद्रा अर्थात शिवमुद्रा चित्र स्वरूपात रेखाटलेली आहे. त्यासोबत मूर्तीजवळ महाराष्ट्राचा कापडी नकाशा देखील ठेवण्यात आला आहे. या कापडी नकाशाचे वैशिष्ट्य म्हणजे महाराजांच्या गड किल्ल्यावरती पडलेल्या झेंडे पताका यापासून हा बनवलेला आहे.
गिरगावच्या राजाची मूर्ती 25 फूट उंचीची असून पूर्णपणे शाळूच्या माती पासून बनवलेली आहे. पर्यावरण पूरक मूर्ती असे प्रमुख वैशिष्ट्य असल्या कारणाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या 'मन की बात' कार्यक्रमामध्ये गिरगावच्या राजाचा उल्लेख देखील केला होता. महाराजांच्या गड किल्ल्यावरील फेकलेल्या रिकाम्या पाण्याच्या बटल्या एकत्र करून मंडळाच्या सभा मंडपामध्ये वेगवेगळ्या प्रकारची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. गिरगावच्या राजाचा मुखदर्शन सोहळा कार्यक्रम छत्रपती संभाजी राजे यांच्या उपस्थितीत झाला होता.

ABOUT THE AUTHOR

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.