Dagdusheth Ganpati Aarti: भारतीय सैन्य दलातील सदर्न कमांडनं केलीय 'दगडूशेठ' गणपतीची आरती, पाहा व्हिडिओ

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 21, 2023, 9:09 PM IST

thumbnail

पुणे Dagdusheth Ganpati Aarti: 'भारत माता की जय' घोषणा देत भारतीय सैन्य दलाच्या सदर्न कमांडमधील ३०० हून अधिक अधिकारी व जवानांनी 'दगडूशेठ' गणपतीची आरती केलीय. भारतीय सैन्य दलाच्या प्रमुख केंद्रांपैकी एक असलेल्या सदर्न कमांड (दक्षिणी मुख्यालय) मधील  कमांडचे जवान 'दगडूशेठ' गणपती चरणी नतमस्तक झालेत. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळच्यावतीनं गणेशोत्सवात जवानांचं स्वागत करण्यात आलंय. यावेळी लेफ्टनंट जनरल ए. के. सिंग, मेजर जनरल, ब्रिगेडियर, कर्नल, मेजर, कॅप्टन, सुभेदार यांसह सैन्य दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हस्ते आरती झाली. ट्रस्टचे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, उपाध्यक्ष सुनील रासने, उत्सव प्रमुख अक्षय गोडसे, सरचिटणीस अमोल केदारी, राजाभाऊ पायमोडे, इंद्रजीत रायकर, माऊली रासने, राजू आखाडे, अमोल चव्हाण उपस्थित होते. पुण्यात असलेल्या 24 मराठा बटालियन, 15 जाट बटालियन आणि 1 महार बटालियनचे जवान व कुटुंबीय यावेळी सहभागी झाले होते. यावेळी सदर्न कमांडतर्फे ट्रस्टला सन्मानचिन्ह देखील देण्यात आलंय. (Indian Army Southern Command in Pune)

ABOUT THE AUTHOR

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.