Asim Sarode On SC Hearing : 'आता नवीन वर्षात घटनेच्या चौकटीत बसणारं कायदेशीर सरकार पाहायला मिळेल'

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 30, 2023, 4:14 PM IST

thumbnail

पुणे Asim Sarode On SC Hearing : आज सर्वोच्च न्यायालयात शिवसेनेच्या आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांच्या बाबत सुनावणी पार पडली. मागील सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाकडून विधानसभा अध्यक्षांना अत्यंत कठोर शब्दांत खडसावलं होतं. मात्र, आजच्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयानं शिवसेनेच्या याचिकांवर 31 डिसेंबर 2023 पर्यंत आणि राष्ट्रवादीच्या याचिकांवर 31 जानेवारी 2024 पर्यंत विधानसभा अध्यक्षांनी निर्णय घ्यावा, (Hearing on ShivSena and NCP MLAs) असं सांगितलं आहे.  

नवीन वर्षात सरकार बदलेल? : याबाबत कायदेतज्ज्ञ असिम सरोदे (Asim Sarode)  यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे. (MLA Disqualification) ते म्हणाले की, अत्यंत आशादायक आहे की नवीन वर्षात महाराष्ट्र प्रवेश करत असताना खोट्यांच्या आधारे ज्यांनी सत्ता हस्तांतरित केली होती आणि जे घटनाबाह्य सरकार सुरू होतं ते चित्र बदलेल आणि नवीन वर्षात घटनेच्या चौकटीत बसणारं कायदेशीर सरकार आपल्याला पाहायला मिळेल. आज सर्वोच्च न्यायालयात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांच्या बाबतीत झालेल्या सुनावणीबाबत घटनातज्ज्ञ असिम सरोदे यांच्याशी आमचे प्रतिनिधी सज्जाद सय्यद यांनी खास बातचीत केली आहे....पाहूया

ABOUT THE AUTHOR

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.